डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 06:40 PM2019-05-25T18:40:53+5:302019-05-25T18:42:21+5:30

उद्या या दोघांना सुट्टीकालीन कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Adv. Sanjeev Punalekar and Vikram Bhave were arrested in connection with the murder of Dr Narmada Dabholkar | डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना अटक 

डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना अटक 

googlenewsNext
ठळक मुद्देयापूर्वी सीबीआयने २०१६ मध्ये सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडे याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. या दोघांना मुंबईतून सीबीआयने अटक केली आहे. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक

मुंबई -  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर या दोघांना आज केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे.मात्र, या दोघांचा या हत्याकांडात काय सहभाग आहे हे अद्याप समजू शाळेला नाही. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली मुंबई हायकोर्टाचे वकील आणि या हत्याकांडातील आरोपींची बाजू मांडणारे वकील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सीबीआयने अटक केली आहे. उद्या या दोघांना सुट्टीकालीन कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोळकर हत्याप्रकरणी पुरावे नष्ट करणे, आरोपींना मार्गदर्शन करण्याचे आरोप आहेत तर विक्रम भावेवर आरोपींना दाभोलकरांची ओळख करुन देणे, प्रत्यक्ष घटनास्थळाची रेकी करणे हे आरोप ठेवण्यात आले आहेत. संजीव पुनाळेकर हे दाभोळकर हत्याकांडातील आरोपींचेही ते वकील आहेत. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात आरोपींच्या जबानीतून पुनाळेकरचे नाव समोर आले होते. विक्रम भावे गडकरी रंगायतन स्फोटातील आरोपी आहे.

सीबीआयने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हेच असल्याचा दावा केला होता. यापूर्वी सीबीआयने २०१६ मध्ये सनातन संस्थेचा साधक वीरेंद्र तावडे याच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यासाठी बेंगलोर येथील पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळे याने दाभोलकर यांचेवर गोळ््या झाडणारा औरंगाबादचा हल्लेखोर सचिन अंदुरे यास पिस्तुल आणि दुचाकी पुरवल्याचा दावा सीबीआयने पुणे न्यायालयात केला होता.
डॉ. वीरेंद्रसिंग तावडे यांच्या सोबतीने इतर आरोपींनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा कट रचल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येसाठी मोटारसायकलवरून आलेले दोन हल्लेखोर अंदुरे आणि कळसकरच होते, असे आत्तापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. २० आॅगस्ट २०१३ रोजी (घटनेच्या दिवशी) ओंकारेश्वर पुलावर सकाळी सव्वासात वाजण्यापूर्वी त्याठिकाणी हल्लेखोरांचे दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपस्थित होते. त्यांनी डॉ. दाभोलकर नेमके कोण याची ओळख हल्लेखोरांना करुन दिल्याचे उघडकीस आले. मारेकऱ्यांना दाभोलकर यांची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष गोळ््या झाडण्यात आल्या आहेत, असे शरद कळसकरकडे केलेल्या चौकशीत समोर आले आहे. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी वैभव राऊत याच्यासह कळसकर याने मुंबई, ठाणे परिसरातील खाडीत चार पिस्तूलांची विल्हेवाट लावल्याचा दावा ही सीबीआयने यापूर्वी न्यायालयात केला होता. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात लवकरच अन्य आरोपी अमोल काळे, अमित दिग्वेकर, राजेश बंगेरा यांच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.

  




 

Web Title: Adv. Sanjeev Punalekar and Vikram Bhave were arrested in connection with the murder of Dr Narmada Dabholkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.