लफडे... अन् ब्लॅकमेल! तीन वर्षांपासून ज्या तरुणीने १० लाख वसूल केले, ती पत्नीच निघाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 04:14 PM2024-07-02T16:14:06+5:302024-07-02T16:14:15+5:30

एका तरुणीने इन्स्टावर आनंद नावाच्या तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. तिने त्याच्यावर दबाव टाकून मंदिरात नेत लग्न केले. इथवर सगळे ठीक होते.

Affaire... and blackmail! The young woman who collected 10 lakhs for three years turned out to be a wife up crime news | लफडे... अन् ब्लॅकमेल! तीन वर्षांपासून ज्या तरुणीने १० लाख वसूल केले, ती पत्नीच निघाली

लफडे... अन् ब्लॅकमेल! तीन वर्षांपासून ज्या तरुणीने १० लाख वसूल केले, ती पत्नीच निघाली

कधी कोणासोबत कोण धोका करेल हे आजच्या धकाधकीच्या जिवणात कोणीच सांगू शकत नाहीय. अनेकदा आपल्याच वडिलांकडून पैसे काढण्यासाठी स्वत:ला किडनॅप करून घेतल्याचे वृत्त येत असते. आधीच फसवाफसवी करून लग्न केलेल्या एका महिलेने आपल्याच पतीकडून १० लाख उकळल्याचा प्रकार उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. 

एका तरुणीने इन्स्टावर आनंद नावाच्या तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले. तिने त्याच्यावर दबाव टाकून मंदिरात नेत लग्न केले. इथवर सगळे ठीक होते. परंतू ही जबरदस्तीने बनलेली पत्नी पुढची निघाली. तिने आनंदच्या नावे फेसबुकवर खोटा आयडी बनविला. त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी तिने काही खासगी फोटो देखील त्यावर पोस्ट केले. याद्वारे ती आनंदकडून तीन वर्षे पैसे उकळत होती. 

हा आनंदचा फेक आयडी कोणी तयार केला हे काही केल्या समजत नव्हते. त्या आयडीवर तिचे नको नको ते फोटो पोस्ट केले जात होते. आनंद ते हटविण्यासाठी पैसे देत होता. ज्या व्यक्तीला देत होता तो कोण हे काही आनंदला कळत नव्हते. अशाप्रकारे आनंद १० लाखांना लुबाडला गेला होता. 
अखेर आनंदने ही गोष्ट आपल्या मामेभावाला सांगितली. त्याने फिरोजाबादच्या फरिहा पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०२१ मध्ये तक्रार दिली.

आनंद आणि श्वेता चौधरी यांची इन्स्टावर ओळख झाली होती. पुढे तिने त्याच्यावर दबाव टाकून लग्न केले होते. या फसवणुकीचा अनुभव असल्याने आनंदची पत्नी असेलेली श्वेता हिच्यावरच संशय होता. हे प्रकरण २०२३ मध्ये सीआयडीकडे आले. त्यांनी फेसबुकच्या अमेरिकेतील मुख्यालयातून फेसबुक आयडीचा आयपी अॅड्रेस मागविला होता. तो आता आला आहे. हा आयडी श्वेताच्याच नावाने रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरून तयार करण्यात आल्याचे फेसबुकने पोलिसांना स्पष्ट केले.  
 

Web Title: Affaire... and blackmail! The young woman who collected 10 lakhs for three years turned out to be a wife up crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.