Shraddha Murder Case: ‘त्या’ दोघांची मैत्री आफताबला खुपायची; श्रद्धाशी भांडला, कट रचला; पोलिसांना साक्षीदार सापडला!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 06:34 PM2022-12-07T18:34:25+5:302022-12-07T18:35:37+5:30
Shraddha Murder Case: हत्येनंतर ४ महिन्यांनी एका मित्राच्या घरी गेला असता, आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
Shraddha Walker Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे देशभरात एकच खळबळ उडाली. आफताब पूनवालाने श्रद्धाचा गळा दाबून खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. हे तुकडे एक एक करत दिल्लीतील मेहरोली परिसरात असलेल्या जंगलात फेकण्यात आले होते. या प्रकरणी दररोज नवनवीत खुलासे होत असून, पोलीसही चक्रावून गेले आहेत. यातच आता आफताब आणि श्रद्धा हिमाचल प्रदेशमध्ये असतानाचे काही धागेदोरे पोलिसांना सापडले आहेत. तेथे असताना एका व्यक्तीशी झालेली मैत्री आफताबला खुपायची. यातूनच त्याने हत्येचा कट रचल्याचे सांगितले जात आहे.
आफताब आणि श्रद्धा मुंबई सोडून दिल्लीला आल्यावर त्यांनी छतरपूरमध्ये एक फ्लॅट भाड्याने घेतला. श्रद्धा आणि आफताब छतरपूरमध्ये राहायला जाण्यापूर्वी हिमाचल प्रदेशला गेले होते. तिथे त्यांची ओळख बद्रीशी झाली. बद्रीच्या घरात श्रद्धा आणि आफताबचे भांडण झाले होते. त्यावेळी बद्रीला मध्यस्थी करायला लागली होती. बद्री हा श्रद्धा आणि आफताबचा मित्र होता. मात्र आफताबला श्रद्धा आणि बद्रीची मैत्री आवडत नव्हती, असे पोलिसांच्या काही सूत्रांकडून सांगण्यात आले.
श्रद्धा बद्रीला मारहाणीबाबत सांगेल याची भीती आफताबला होती
बद्री आणि आफताबची मैत्री वाढली. आफताब श्रद्धाला मारहाण करायचा. श्रद्धा ही बाब बद्रीला सांगेल, याची भीती आफताबला होती, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकाने दिली. तसेच श्रद्धा आणि बद्री चांगले मित्र झाले. बद्रीच्याच सल्ल्यावरून दोघे मेच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीला आले. सुरुवातीला दोघे गेस्ट हाऊसमध्ये राहिले. मग हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. यानंतर त्यांनी बद्रीच्या मदतीने १४ मे रोजी छतरपूरमध्ये फ्लॅट भाड्याने घेतला. याच फ्लॅटमध्ये १८ मे रोजी आफताबने श्रद्धाची हत्या केली, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, बद्रीच्या घरात आफताब आणि श्रद्धाचा वाद झाला होता. बद्रीसमोरच दोघे भांडले. त्यांचा वाद बद्रीनंच सोडवला. त्यामुळे बद्री या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. बद्रीचे घर महरौलीतील जंगल परिसराजवळ आहे. आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले. ४ महिन्यांनंतरही त्याला तुकडे कुठे टाकायचे ते समजत नव्हती. बद्रीच्या घरी गेला असताना आफताब गच्चीत फिरत होता. त्यावेळी त्याने जंगल पाहिले आणि याच भागात तुकडे फेकण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"