उद्या आफताबची नार्को टेस्ट? श्रद्धाच्या हत्येचा उलगडा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 07:33 AM2022-11-20T07:33:52+5:302022-11-20T07:34:31+5:30

श्रद्धा आणि आफताब हे मुंबईतील वसईच्या रीगल अपार्टमेंटमध्ये घर भाड्याने घेताना आपण पती-पत्नी असल्याचे सांगितले हाेते.

Aftab's narco test tomorrow? Shraddha's murder will be revealed | उद्या आफताबची नार्को टेस्ट? श्रद्धाच्या हत्येचा उलगडा होणार

उद्या आफताबची नार्को टेस्ट? श्रद्धाच्या हत्येचा उलगडा होणार

googlenewsNext

नवी दिल्ली :श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी पोलिसांनी आफताब पूनावालाच्या नार्को टेस्टची मागणी केली असून, ती न्यायालयाने मान्य केली आहे. ती साेमवारी हाेण्याची शक्यता आहे. नार्को टेस्टच्या माध्यमातून पोलिसांना काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. श्रद्धाची हत्या का केली, कशी केली, शस्त्र आणि अन्य पुरावे कुठे आहेत, या हत्येत आणखी कोण सहभागी आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या माध्यमातून मिळतील अशी अपेक्षा आहे.

श्रद्धा आणि आफताब हे मुंबईतील वसईच्या रीगल अपार्टमेंटमध्ये घर भाड्याने घेताना आपण पती-पत्नी असल्याचे सांगितले हाेते. फ्लॅटच्या मालक जयश्री पाटकर यांनी सांगितले की, दोघांनीही एजंटला सांगितले होते की, कुटुंबातील अन्य लोकही सोबत राहणार आहेत. आपण कधीही या दोघांना भेटलो नाही. 

आफताबचे वागणे सराईत गुन्हेगारासारखे 
श्रद्धा वालकर बेपत्ता झाल्यानंतर तपास सुरू असताना माणिकपूर पोलिसांनी दोन वेळा चौकशीसाठी आफताब पूनावाला याला बोलावले होते. तेव्हा तो सराईत गुन्हेगारासारखा वागल्याचे मत पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. त्याने संगितले की, या दोन्हीही वेळेस त्याने दिलेल्या जबानीत तफावत आढळली होती. यामुळे माणिकपूर पोलिसांचे पथक दिल्लीला गेले होते. त्याने विचारलेल्या प्रश्नांना उतरे देताना आपण त्या गावचेच नाही हे दाखविण्याचा प्रयत्न केला होता.

Web Title: Aftab's narco test tomorrow? Shraddha's murder will be revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.