लग्नाच्या ८ वर्षांनी बायकोला समजलं नवऱ्याचं रहस्य; ऐकून पायाखालची जमीन सरकली, मग..
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 01:22 PM2022-09-17T13:22:12+5:302022-09-17T13:22:50+5:30
लग्नानंतर पती विराजसोबत हनीमूनसाठी आम्ही काश्मीरला गेलो. त्याठिकाणी विराज पत्नीशी जवळीक साधण्यासाठी स्वारस्य दाखवत नव्हता.
गुजरातच्या वडोदरा इथं असं प्रकरण समोर आलंय जे ऐकून कुणीही हैराण होईल. याठिकाणी लग्नाच्या तब्बल ८ वर्षानंतर पत्नीसमोर पतीचं एक सीक्रेट उघड झालं ज्यानं पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. महिलेला सत्य समजल्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पतीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
या घटनेबाबत पत्नी शीतलनं(बदललेलं नाव) सांगितले की, माझ्या पहिल्या पतीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. माझी १४ वर्षांची मुलगी होती. त्यामुळे मी दुसरं लग्न करण्याचं ठरवलं. जवळपास ९ वर्षापूर्वी तिची ओळख मेट्रोमोनियल साइटवरून विराज वर्धन नावाच्या व्यक्तीसोबत झाली. आम्ही दोघं एकमेकांच्या संपर्कात आलो. चांगली ओळख झाल्यानंतर आम्ही लग्न करण्याचं ठरवलं. २०१४ मध्ये कुटुंबाच्या परवानगीने आम्ही लग्नाच्या बंधनात अडकलो असं तिने म्हटलं.
लग्नानंतर पती विराजसोबत हनीमूनसाठी आम्ही काश्मीरला गेलो. त्याठिकाणी विराज पत्नीशी जवळीक साधण्यासाठी स्वारस्य दाखवत नव्हता. अनेक दिवस आम्ही एकमेकांशी शारिरीक संबंध ठेवले नाहीत. जेव्हाही शीतलनं विराजवर शारिरीक संबंधांसाठी दबाव टाकला तेव्हा विराजनं बहाणा करुन तिला टाळणं सुरू केले. काही वर्षापूर्वी रशियात झालेल्या एका दुर्घटनेमुळे मी लैंगिक संबंध बनवण्यात असमर्थ असल्याचं विराजनं शीतलला सांगितले.
जबरदस्तीने ठेवले अनैसर्गिक लैंगिक संबंध
शीतलनं आरोप केला की, २०२० मध्ये विराज वजन वाढल्याचा बहाणा करत बेरियाट्रिक सर्जरीसाठी कोलकाताला गेला होता. कोलकात्यात जाऊन विराजने पुरुषांच्या अवयवांचे प्रत्यारोपण करण्यासाठी शस्त्रक्रिया केली असा दावा तिने केला. कोलकाताहून परत येऊन विराजने शीतलसोबत जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले आणि याबाबत कोणाला सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. शीतलला विराजचे वास्तव समजताच तिने पोलिसांत बळजबरीने अनैसर्गिक शारीरिक संबंध आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला.