लग्नाच्या दीड महिन्यानंतर नवविवाहितेला कारसाठी टाकले मारून

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 09:33 PM2022-04-05T21:33:36+5:302022-04-05T21:34:35+5:30

Dowry Case :नववधूच्या हातावरची मेहंदीचा रंगही फिका पडला नव्हता आणि तिच्या मृत्यूच्या बातमीने तिचे कुटुंबीय हादरून गेले आहे.

After a month and a half of marriage, the newlyweds killed for a car | लग्नाच्या दीड महिन्यानंतर नवविवाहितेला कारसाठी टाकले मारून

लग्नाच्या दीड महिन्यानंतर नवविवाहितेला कारसाठी टाकले मारून

googlenewsNext

हाजीपूर- बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरमध्ये हुंड्यासाठी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. महिलेची हत्या केल्याचा आरोप तिच्या सासरच्या मंडळींनी केला आहे. विजया कुमारी उर्फ ​​निधी कुमारी यांचे दीड महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. नववधूच्या हातावरची मेहंदीचा रंगही फिका पडला नव्हता आणि तिच्या मृत्यूच्या बातमीने तिचे कुटुंबीय हादरून गेले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारीला वैशालीच्या लालगंज पोलीस स्टेशन हद्दीतील रौडी पोखर गावातील बबन सिंह यांनी आपली मुलगी विजया कुमारी उर्फ ​​निधी कुमारी हिचा विवाह सराई पोलीस स्टेशन हद्दीतील शंभूपूर कोअरी गावातील रहिवासी रणवीर सिंहसोबत केला होता. लग्नात भेट म्हणून पाच लाख रोख, दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ९४ हजार पाचशे रुपये किमतीची मोटारसायकल आणि सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे घरगुती साहित्य दिले. मात्र, विजयासोबतच तिच्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी चारचाकी (कार) साठी तिला मारहाण व छळ करण्यास सुरुवात केली.

पीडित मुलगी तिच्या आईला फोनवरून छळाची माहिती देत ​​असे. मृताच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा फोन आला. मुलीचे संपूर्ण कुटुंब तात्काळ  मुलीच्या घरी पोहोचले, तेव्हा विजयाचा मृतदेह जमिनीवर पडला होता. तिच्या मानेवर खोलवर खुणा होत्या. त्याचवेळी मुलीचे सासरचे लोक घर सोडून फरार झाले आहेत. विजयाच्या वडिलांनी माहिती दिल्यानंतर, सराई पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि तिचा मृतदेह त्यांच्या ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी हाजीपूर सदर रुग्णालयात पाठवला.

नवविवाहित मुलीच्या हत्येनंतर तिच्या घरात हाहाकार माजला आहे. बबन सिंग यांनी आपल्या मुलीच्या सासरच्या मंडळींवर हत्येचा आरोप करत सराई पोलीस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक करण्यासाठी छापेमारी सुरू असल्याचे सराई पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी म्हणाले.

Web Title: After a month and a half of marriage, the newlyweds killed for a car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.