अपहरणानंतर चाकूच्या धाकावर धावत्या कारमध्ये मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 11:10 PM2020-10-05T23:10:09+5:302020-10-05T23:10:45+5:30

ओळखीतील एका युवकाला झोपेतून उठवून सिगारेट पिण्याच्या बहाण्याने नेऊन त्याचे अपहरण केले. यानंतर तिघांच्या मदतीने चाकूचा धाक दाखवून धावत्या कारमध्ये त्याला अमरावतीहून नांदेडपर्यंत मारहाण करण्यात आली.

After the abduction, he was stabbed in a speeding car | अपहरणानंतर चाकूच्या धाकावर धावत्या कारमध्ये मारहाण 

अपहरणानंतर चाकूच्या धाकावर धावत्या कारमध्ये मारहाण 

Next

अमरावती - ओळखीतील एका युवकाला झोपेतून उठवून सिगारेट पिण्याच्या बहाण्याने नेऊन त्याचे अपहरण केले. यानंतर तिघांच्या मदतीने चाकूचा धाक दाखवून धावत्या कारमध्ये त्याला अमरावतीहून नांदेडपर्यंत मारहाण करण्यात आली. त्याचे मुंडण करण्याचा व्हिडीओ काढण्यात आला. ही धक्कादायक घटना परिगणित कॉलनीत रविवारी पहाटे ५.३० च्या सुमारास घडली. 

महेश वानखडे, गोविंद, शंकर, गणेश (सर्व रा. नमस्कार चौक, नांदेड) अशी आरोपींची नावे आहेत. गजानन सुभाषराव चौके (२३, रा. टाकळी जहागीर ह.मु. परिगणित कॉलनी) याने याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार, तो व आतेभाऊ महेंद्र मुंडाले हे सात वर्षांपासून परिगणित कॉलनीत भाड्याने राहतात. त्याच्या घरमालकाच्या मुलीचे लग्न जुलै २०२० मध्ये महेश वानखडेशी झाले आहे. त्यामुळे महेशची गजाननशी ओळख झाली. 
रविवारी गजानन झोपला असता, आतेभावाने त्याला उठविले व महेश आल्याचे सांगितले.  महेशने चहा व सिगारेटच्या बहाण्याने खाली नेले व कारमध्ये बसण्यास सांगितले. त्यात आधीच तिघे होते. शहराबाहेर लोणीजवळ कार येताच महेशच्या इशाºयावर शंकरने फिर्यादीस चाकू दाखविले व एका महिलेसोबत असलेले संबंध तोड, असे म्हणून शिवीगाळ केली. सर्वांनी त्याला  धावत्या कारमध्ये थापडाबुक्क््यांनी मारहाण केली. त्याचे मुंडण करून   व्हिडीओ तयार करण्यात आला. मारहाण करीत नांदेडला नेले तसेच  त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. त्याला नांदेड येथील नमस्कार चौकात सोडून दिली. आरोपीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर गजाननने आतेभावाच्या मदतीने अमरावती गाठून ठाण्यात सोमवारी तक्रार नोंदविली. आरोपींविरुद्ध कलम ३६३, ३२३, ५०४, ५०६ (ब) अन्वये गुन्हा नोंदविला.

युवकाचे अपहरण करून कारमध्ये मारहाण केल्याची तक्रार आहे तसेच त्याचे मुंडणही करण्यात आले. तक्रारीवरून  चार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तपास सुरू आहे. 
- पुंडलिक मेश्राम, वरीष्ठ पोलीस निरीक्षक  फ्रेजरपुरा, अमरावती

Web Title: After the abduction, he was stabbed in a speeding car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.