अर्णबनंतर फिरोज शेख, नितेश सारडा पोलिसांच्या ताब्यात; न्यायालयात केले हजर

By हेमंत बावकर | Published: November 4, 2020 08:19 PM2020-11-04T20:19:04+5:302020-11-04T20:23:27+5:30

Anvay Naik Case : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना (Republic TV Editor-in-Chief Arnab Goswami) आज सकाळी ७ वाजता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली. नाईक यांच्या चिठ्ठीत आणखी काही नावे होती.

After Arnab Goswami, Feroz Sheikh, Nitesh Sarda in police custody; Appeared in court | अर्णबनंतर फिरोज शेख, नितेश सारडा पोलिसांच्या ताब्यात; न्यायालयात केले हजर

अर्णबनंतर फिरोज शेख, नितेश सारडा पोलिसांच्या ताब्यात; न्यायालयात केले हजर

googlenewsNext

मुंबई/ रायगड : अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर नाईक यांच्या चिठ्ठीत नावे असलेले फिरोज शेख, नितेश सारडा यांनाही पोलिसांनी सायंकाळी अटक केली आहे. 


रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना (Republic TV Editor-in-Chief Arnab Goswami) आज सकाळी ७ वाजता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप अर्णब यांनी केला होता. तो रायगडमधील न्य़ायालयाने फेटाळला आहे. मात्र, या वेळी अर्णब गोस्वामीने कारवाईवेळी आलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. सध्या तिघांचीही रायगडच्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे. 

Arnab Goswami Arrested: अर्णब गोस्वामींच्या घरी पोलीस पोहोचले तेव्हा काय घडलं?...पाहा Video


2018 मध्ये इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील घरी आत्महत्या केली होती, त्यांच्या मृतदेहाशेजारी अन्वय यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. याठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आर्थिक बाबींमुळे आत्महत्या केल्याचं उघड झालं, मात्र या पत्रात अर्णब गोस्वामी यांचाही उल्लेख करण्यात आला होता. अलीकडेच ठाकरे सरकारनं या प्रकरणाची चौकशी पुन्हा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज अर्णब गोस्वामींना पकडून कोर्टात हजर करण्यात आले आहे. या चिठ्ठीत गोस्वामी यांनी 83 लाख, फिरेज शेख यांनी 4 कोटी, नितेश सारडा यांनी 55 लाख रुपये थकविल्याचे म्हटले होते. ही चिठ्ठी नाईक यांच्या मुलीने आज पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांना दिली.

Anvay Naik : अन्वय नाईक कोण होते?, त्यांची आत्महत्या आणि अर्णब गोस्वामींचं कनेक्शन काय?... वाचा


अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीने पैसे थकवल्यानेच आत्महत्या
'अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीने पैसे थकवल्यानेच आपल्या पतीने आत्महत्या केली. अन्यथा ते आज जिवंत असते, असा गंभीर आरोप अन्वय यांच्या पत्नीने केला आहे.' त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी त्यांची मुलगीही त्यांच्यासोबत होती. अन्वय यांच्या मुलीने सांगितले, की संबंधित लोकांनी आपल्या पतीचे 83 लाख रुपये थकवले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी न्याय देणे अपेक्षित होते. आम्हाला राजकारणात पडायचे नाही. आम्हाला न्याय हवा आहे. आम्ही याआधी सर्वाना विनंती केली, तपास अधिकाऱ्यांनी दबाब आणला. आज झालेली अटक आधीच होणे गरजेचे होते. वडिलांनी अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितीन सार्डा या 3 जणांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिले होती. हा वडिलांचा शेवटचा प्रोजेक्ट होता. आम्ही एक नागरिक म्हणून, पोलिसांवर विश्वास ठेऊन एफआयआर करतो आणि ती कचऱ्याच्या डब्ब्यात का जाते? असा सवालही यावेळी अन्वय यांच्या पत्नीने केला. 

 

Web Title: After Arnab Goswami, Feroz Sheikh, Nitesh Sarda in police custody; Appeared in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.