इंजिनिअर बनताच शाळेपासूनच्या गर्लफ्रेंडने दगा दिला; प्रेमात वेडा तरुण मांत्रिकाच्या नादी लागला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 02:10 PM2023-01-19T14:10:42+5:302023-01-19T14:14:25+5:30
दीपकचे त्याच्या शाळेपासून एका मुलीवर प्रेम करत होता. ती देखील बऱ्याचदा त्याच्या घरी यायची. लग्नही करणार होते.
झारखंडची राजधानी रांचीमध्ये एक विचित्र प्रेमकहाणी घडली आहे. एमबीएच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि खळबळ उडाली आहे. यामध्ये धर्मातराचाही मुद्दा आल्याने पोलिसही हादरले आहेत. दीपक कुमार असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वडील निवृत्त सैनिक आहेत.
दीपकचे त्याच्या शाळेपासून एका मुलीवर प्रेम करत होता. ती देखील बऱ्याचदा त्याच्या घरी यायची. दोघांच्या लग्नाला दीपकच्या घरच्यांची परवानगी होती. परंतू, स्वत:च्या पायावर उभे राहिल्यावर तिच्या घरच्यांकडे मागणी घालायची असे दीपकने घरातल्यांना सांगितले होते.
दीपकची प्रेयसी इंजिनिअरिंगला होती, तर दीपक एमबीए करत होता. ती खलारीची होती. दोघेही एकमेकांवर प्रेम करत होते. परंतू, प्रेयसीचे इंजिनिअरिंग पूर्ण झाले आणि तिला बंगळुरुला नोकरी लागली व सारे बिघडले. तिने नोकरी लागताच त्याच्यापासून वेगळे होण्यास सुरुवात केली. दीपकशी बोलणे देखील बंद केले. यामुळे दीपक त्रस्त झाला होता.
ही गोष्ट दीपकने त्याचा मित्र नसीमला सांगितली, त्याने दीपकला एका मौलवीकडे नेले, त्याने काळ्या जादुने तुझी गर्लफ्रेंड तुला पुन्हा मिळवून देतो असे सांगितले. दीपकला ते ब्लॅकमेल करू लागले. त्याला धर्मांतरही करण्यास सांगितले गेले, असा आरोप दीपकच्या वडिलांनी केला आहे. यामुळे त्रस्त झालेल्या दीपकने मंगळवारी घरात आत्महत्या केली.
दीपकचे तरुणीसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. रांचीमध्ये शिकत असताना मुलगी अनेकदा त्याच्या खोलीतही यायची. यापूर्वी दोघांमध्ये चांगले संबंध होते. एकदा मुलीला स्टेशन सोडायचे होते, त्या दिवशी पाऊस पडत होता. त्या वादळी पावसात दीपकने आपला रेनकोट त्या मुलीला दिला आणि स्वतः ओला होऊन तिला स्टेशनवर सोडायला गेला. पण अचानक असे काही घडले की नाही माहीत नाही. त्यानंतर दीपक शांत शांत असायचा, जेवतही नसायचा असे त्याच्या बहीणीने सांगितले.