महिलेच्या तक्रारीनंतर गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 08:42 PM2018-10-10T20:42:28+5:302018-10-10T21:31:53+5:30
मी नेहमी महिलाचा आदर करतो.मात्र दोन दिवसापूर्वी एक तक्रारदार महिला व तिचा पती मला मुंबईत भेटले होते. त्यावेळी तेथे चाळीस ते पन्नास माणसं उपस्थित होती
सावंतवाडी - मी नेहमी महिलाचा आदर करतो.मात्र दोन दिवसापूर्वी एक तक्रारदार महिला व तिचा पती मला मुंबईत भेटले होते. त्यावेळी तेथे चाळीस ते पन्नास माणसं उपस्थित होती. महिलेच्या पतीने पोलिसाबाबत चुकीचे शब्द वापरले होते. त्यावेळी मी तिच्या पतीला मोठ्याने बोलू नका तुमच्यासाठी पोलीस अधीक्षकांना संबंधित प्रकरणाची माहिती घेण्यासाठी बोलवले होते. मग त्याच्याविषयी चुकीचे बोलणे योग्य नाही. म्हणून मी त्याच्या पतीला बोललो होतो. मात्र, त्याच्या पत्नीविषयी अनुउद्गार काढले नाही असा खुलासा राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. ते सावंतवाडी येथे बोलत होते. काल मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात एका महिलेने तिला अपशब्द वापरल्याने दीपक केसरकर यांच्याविरोधात तक्रार अर्ज दिल्यानंतर गृहराज्यमंत्री केसरकर यांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.
लायकी काढणाऱ्या दीपक केसरकरांविरोधात पीडित महिलेने केली पोलिसांत तक्रार