रात्री जेवणानंतर फिरणे पडले महागात, दुचाकीवरुन आला अन् मंगळपोत हिसकावून गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 06:37 PM2020-09-29T18:37:15+5:302020-09-29T18:39:22+5:30
याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव : रात्री जेवण झाल्यानंतर घराबाहेर रस्त्याने फिरणे पती-पत्नीला चांगलेच महागात पडले आहे. भरधाव दुचाकीवरुन आलेल्या एका तरुणाने रस्त्याने चालत असलेल्या लता पांडूरंग बढे (६५, रा. गजानन हौसिंग सोसायटी, रामानंद नगर) यांच्या गळ्यातील १५ ग्रॅमची ४० हजार रुपये किमतीची मंगळपोत लाबंवून पलायन केल्याची घटना सोमवारी रात्री १०.३०वाजता रामानंद नगरातील चर्चजवळ घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लता बढे व त्यांचे पती पांडूरंग बढे हे सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर ९ वाजता घराबाहेर फिरायला गेले होते. घरापासून काही अंतरावर काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन लाल टी शर्ट परिधान केलेला तरुण आला व काही क्षणातच लता यांच्या गळयातील मंगळपोत तोडून काव्यरत्नावली चौकाकडे भरधाव वेगाने निघून गेला. यावेळी बढे दाम्पत्याने आरडाओरड केली, मात्र काही उपयोग झाला नाही. काही अंतरावर सोन्याचे एक पदक रस्त्यावर आढळून आले. या घटनेनंतर दाम्पत्याने रामानंद नगर गाठून पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.
पोलिसांच्या डोळ्यात तरळले अश्रू, जिभेचा तुकडा पडूनही पीडितेने नराधमांविरोधात जबाब देण्याचा केला प्रयत्न https://t.co/OEUq0mVOdf
— Lokmat (@MiLOKMAT) September 29, 2020