कुटुंबीयांना झोपेच्या गोळ्या देऊन शेजाऱ्यासोबत पळाली अल्पवयीन मुलगी, सोनंनाणंही नेलं आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2021 11:00 AM2021-09-02T11:00:43+5:302021-09-02T11:04:00+5:30
Crime News: एक अल्पवयीन मुलगी शेजाऱ्यासोबत पळून गेली आहे. जाताना तिने घरातून ६५ हजार रुपये रोख रक्कम आणि साडे तीन तोळे सोने आणि ४० तोळे चांदीसुद्धा नेली आहे.
पानीपत (हरयाणा) - हरियाणामधील पानीपत जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील किला ठाणे क्षेत्रातील एका कॉलनीमधून ही बातमी समोर आली आहे. येथील एक अल्पवयीन मुलगी शेजाऱ्यासोबत पळून गेली आहे. जाताना तिने घरातून ६५ हजार रुपये रोख रक्कम आणि साडे तीन तोळे सोने आणि ४० तोळे चांदीसुद्धा नेली आहे. पीडित वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर किला ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये संबंधित तरुणीच्या वडिलांनी सांगितले की, ते एका फॅक्टरीमध्ये काम करतात. त्यांना तीन मुली आहेत. त्यापैकी दोघींचा विवाह केला आहे. तर तिसरी मुलगी १७ वर्षांची आहे. त्यांनी सांगितले की, या सर्वात लहान मुलीने मंगळवारी रात्री कुटुंबीयांना भाजीमधून गुंगीच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता उठण्याऐवजी ९ वाजेपर्यंत उठलेच नाही.
जेव्हा जाग आली तेव्हा घरामध्ये मुलगी नसल्याचे आढळून आले. तसेच घरासीत सर्व सामान विस्कटून गेले होते. तसेच घरातील पैसे आणि दागिने गायब होते. अधिक पडताळणी केली असता शेजारचा तरुणही गायब असल्याचे दिसून आले. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, आरोपी युवकाने त्यांच्या मुलीला फूस लावून पळवून नेले आहे. आरोपीच्या कुटुंबीयांशी बोलले असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. दरम्यानक गुन्हा दाखल झाल्यानंतर किला पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये पीडित वडिलांनी सांगितले की, आरोपीच्या कुटुंबीयांना दोघांबाबत माहिती दिली आहे. मोबाईल लोकेशन ट्रेसिंगपासून वाचण्यासाठी सदर मुलाचे कुटुंबीय त्यांच्यासोबत सोशल मीडिया अॅपवरून बोलत आहेत. आता पोलिसांनी या दोघांनाही तीन दिवसांत शोधून काढण्याचे आश्वासन दिले आहे.