हार्बरनंतर आता वेस्टर्न! मुंबईत लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग; तरुणाचे अश्लिल चाळे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 10:31 AM2023-06-30T10:31:38+5:302023-06-30T10:31:51+5:30

तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

After Harbor Now Western! Young girl molested in a local in Mumbai; Young man's obscene act, Fir registered | हार्बरनंतर आता वेस्टर्न! मुंबईत लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग; तरुणाचे अश्लिल चाळे

हार्बरनंतर आता वेस्टर्न! मुंबईत लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग; तरुणाचे अश्लिल चाळे

googlenewsNext

काही दिवसांपूर्वी सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये अत्याचाराची घटना ताजीच असताना आता पुन्हा एकदा मुंबईतील लोकल महिलांसाठी सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. पश्चिम रेल्वेवरील ग्रॅन्ट रोडजवळ लोकलमध्ये २४ वर्षीय तरुणीची छेडछाड, अश्लिल बोलून शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

तरुणाविरोधात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तरुणी मालाडला राहते. ती गेल्या शुक्रवारी रात्री कामानिमित्ताने चर्नी रोडला जात होती. ग्रॅन्ट रोड स्थानकाजवळ येताच तरुणाने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. 

तरुणीने आरडाओरडा केला, परंतू लोकलचा वेग कमी होताच त्याने उडी मारून पलायन केले. या तरुणाने तिच्याशी अश्लिल चाळे, वक्तव्ये केली. हे प्रकरण गेल्या आठवड्यातील शुक्रवारचे आहे. तर बुधवारी तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

मुंबई-पनवेल लोकलमध्येही असाच प्रकार घडलेला...
काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीने नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे पकडली होती. सदर मुलगी महिलांसाठीच्या जनरल डब्यातून प्रवास करत होती. सकाळची वेळ असल्यामुळे महिला डब्यामध्ये विशेष प्रवासी नव्हते. याचाच गैरफायदा घेत आरोपीने सीएसएमटी स्थानकात गाडीने वेग घेतल्यानंतर महिला डब्यात प्रवेश केला होता. दारूच्या नशेतील तरुणाने तिच्याशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी मशीद बंदर स्थानकावर लोकलमधून उतरला आणि बाहेर पळून गेला होता. 

Web Title: After Harbor Now Western! Young girl molested in a local in Mumbai; Young man's obscene act, Fir registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.