गोडीगुलाबीने शेतात घेऊन गेला अन् शरीरसुखाचा आनंद घेतला; त्यानंतर पत्नीची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 07:15 PM2021-02-08T19:15:46+5:302021-02-08T19:24:14+5:30
महिलेच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
नवी दिल्ली: गोडीगुलाबीने आरोपी पीडित महिलेला जवळच्या शेतात घेऊन गेला. त्यानंतर तिथे आरोपीने पीडितमहिलेसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पीडित महिलेच्याच ओढणीने तिची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर ओरोपी पतीने २५ वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केली. उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात शनिवारी ही धक्कादायक घटना घडली. रविवारी शेतात मृतदेह सापडल्यानंतर हत्येचा हा गुन्हा उघडकीस आला. महिलेच्या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
मला पीडित पत्नीसोबत संसार करायचा होता. पण माझ्या घरी नांदण्यास ती आणि तिच्या आई-वडिलांचा विरोध होता. त्यामुळे मी पत्नीच्या हत्येचे कारस्थान रचले, असे आरोपीने पोलिसांना सांगितले. आरोपी कानपूर देहात जिल्ह्यातील नासीरपूर गावचा राहणारा आहे. पत्नी हमीरपूरला तिच्या आई-वडिलांकडे राहत होती. दोघांच्या लग्नाला तीन वर्ष झाली असून, त्यांना दोन वर्षांचा मुलगाही आहे.
आरोपी आणि त्याच्या घरचे हुंड्यासाठी सतत पीडित महिलेचा छळ करायचे. त्यामुळे सततच्या या भांडणाला कंटाळून ती तिच्या आई-वडिलांकडे निघून गेली. दोन फेब्रुवारीपासून पीडित महिला बेपत्ता होती. तीन फेब्रुवारीला पीडित महिलेच्या आई-वडिलांनी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तिच्या आई-वडिलांनी पोलिसांशी बोलताना, जावयावर संशय व्यक्त केला होता.
नवी दिल्ली: पत्नीसोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर ओरोपी पतीने २५ वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केली. उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात शनिवारी ही धक्कादायक घटना घडली आहे.
— Lokmat (@MiLOKMAT) February 8, 2021
आरोपीने पैसे देण्याच्या बहाण्याने पीडित पत्नीला हमीरपूरमध्येच बाहेर भेटायला बोलावले. पीडित महिला भेटल्यानंतर तो तिला गोडीगुलाबीने जवळच्या शेतात घेऊन गेला, तिथे त्याने तिच्याबरोबर शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पीडित महिलेच्याच ओढणीने तिची गळा आवळून हत्या केली. तिचा मृतदेह कोणाच्या नजरेस पडणार नाही, अशी पद्धतीने शेतामध्ये लपवला. त्यानंतर आरोपीने तिचा मोबाइल फोन नदीत फेकून दिला होता, असं संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.