पतीच्या तोंडून निघालं 'असं' वाक्य; पत्नीने ४ दिवसांनी घेतला भयानक बदला, आधी...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 02:24 PM2023-06-07T14:24:12+5:302023-06-07T14:24:32+5:30
पत्नीचा चेहरा झाकलेला होता. केवळ डोळेच दिसत होते जेणेकरून तिला कुणी ओळखू नये.
एका महिलेने तिच्या पतीला भयानक शिक्षा दिली आहे. पतीने पत्नीला बोललेल्या एका वाक्यामुळे भडकलेल्या पत्नीने त्याचा बदला घेतला. या महिलेने उकळतं पाणी पतीवर फेकले. त्यामुळे पतीच्या कमरेवरील त्वचा पूर्णत: भाजली. २८ वर्षीय रहिमा निस्वा या आरोपी पत्नीला या प्रकारामुळे ८ महिन्याची जेलची शिक्षा झाली आहे.
साऊथ चाइना मॉर्निंग पोस्ट रिपोर्टनुसार, रहिमा आणि तिचा पती मोहम्मद रहिमी शामिर अहमत साफौन यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. ज्यामुळे या दोघांना वेगवेगळे राहावे लागत आहे. रहिमी ही मूळची मलेशियाची असून सिंगापूरची रहिवासी आहे. तर त्याची पत्नी रहिमा तिच्या माहेरी इंडोनेशियात राहायला आहे. या दोघांच्या लग्नाला ५ वर्ष झाली. परंतु डिसेंबर महिन्यापासून त्या दोघांच्या नात्यात खटके उडायला लागले.
रहिमाने ४ दिवसांनी घेतला बदला
एकेदिवशी रहिमाने पत्नी आणि सासू यांच्या चर्चेवेळी पहिल्यांदा घटस्फोटाबाबत विधान केले होते. तेव्हा पत्नीने विरोध केला नाही. ना ती नाखुश होती. परंतु काही दिवसांनी २२ मार्च रहिमी सिंगापूरला आली होती. त्याठिकाणी पतीच्या घराची रेकी केली त्यानंतर एका मित्रासोबत हॉटेलमध्ये थांबली. मग २३ मार्च रोजी सकाळी हॉटेलमधून गरम पाणी आणले. ती सकाळी ७.२० मिनिटांनी पतीच्या घरी पोहचली. त्याने काळ्या रंगाचे कपडे घातले होते. चेहरा झाकलेला होता. केवळ डोळेच दिसत होते जेणेकरून तिला कुणी ओळखू नये.
पती ७ वाजून ३० मिनिटांनी जेव्हा घराबाहेर निघाला, बूट घालण्यासाठी तो पायऱ्यांवर बसला होता. तेव्हा रहिमी पतीच्या दिशेने धावत गेली आणि उकळतं पाणी त्यांच्या अंगावर फेकले. त्यानंतर तिने तिथून पळ काढला. या घटनेत पती तडफडत होता. त्याने शर्ट काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पतीला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
कोर्टाच्या दस्तावेजात गुन्ह्यामागचे कारण सांगितले नाही. त्यानंतर रहिमा तिच्या मित्राला भेटली आणि दोघे इंडोनेशियाला पळाले. पोलिसांनी या घटनेत आरोपी पत्नीला अटक केली. कोर्टात सुनावणीवेळी तिने पतीसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. माझ्या मुलांसाठी मी काहीही करायला तयार आहे असं तिने कोर्टाला सांगितले.