'लग्न लावून द्या नाही तर व्हिडीओ लीक करतो'...होणाऱ्या नवरदेवाने नवरीच्या आईला दिली धमकी आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 02:44 PM2022-04-26T14:44:35+5:302022-04-26T14:45:29+5:30
Bihar Crime News : तीन महिने उलटल्यानंतर तरूणीच्या कुटुंबियांनी होणाऱ्या नवरदेवाचं वागणं-राहणीमान बघता लग्न करण्यास नकार दिला. यामुळे तरूण संतापला.
Bihar Crime News : बिहारच्या बगहामध्ये लग्न कॅन्सल झालं म्हणून एका तरूणाने असं काही केलं ज्यामुळे त्याला तुरूंगाची हवा खाली लागणार आहे. बगहाच्या एका गावातील तरूणीचं लग्न यूपीमध्ये ठरलं होतं. तीन महिने उलटल्यानंतर तरूणीच्या कुटुंबियांनी होणाऱ्या नवरदेवाचं वागणं-राहणीमान बघता लग्न करण्यास नकार दिला. यामुळे तरूण संतापला.
तरूणाने तरूणीच्या आईला तरूणीने काही अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवले. मग धमकी देत म्हणाला की, जर त्याचं तरूणीसोबत लग्न लावून दिलं नाही तर तो व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल. यानंतर तरूणीची आई पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिने आरोपीसहीत चार लोकांविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसात दिलेल्या तक्रारीत तरूणीच्या आईने सांगितलं की, गावातील आपल्या नातेवाईकच्या मुलासोबत लग्न करण्यासाठी तरूणीच्या कुटुंबियांना तयार करण्यात आलं. सुमित्रा देवीच्या सांगण्यावरून यूपीच्या घुघलीमधील नारायणपूर येथील चंदेश्वर तिवारीसोबत तरूणीचं लग्न ठरवण्यात आलं. लग्न ठरवणारी सुमित्रा देवीने नवरदेवाला नवरीचा मोबाइल नंबर मिळवून दिला. दोघे फोनवर बोलू लागले होते आणि मग नंतर नवरदेव तरूणीवर प्रेशर टाकून तिचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करू लागला होता. यादरम्यान त्याने तरूणीने अनेक व्हिडीओ रेकॉर्ड केले.
जेव्हा तरूणीच्या कुटुंबियांना समजलं की, तरूणाचं राहणं-वागणं चांगलं नाहीये. तर त्यांनी लग्न मोडलं. त्यानंतर संतापलेल्या नवरदेवाने तरूणीच्या आईला तरूणीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवून धमकी दिली. त्यावरून तो तरूणीसोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकू लागला होता.
पीडितेच्या आईने सांगितलं की, १९ एप्रिलला सुमित्रा देवीच्या घरी चंदेश्वर चौधरी, रमेश चौधरी आणि धीरेंद्र चौधरी आले. ते तरूणीला फसवून बगहा बाजारात घेऊन गेले. तिथे त्यांनी तिला व्हिडीओ दाखवले आणि धमकी देत लग्न करण्यास सांगितलं.
महिला पोलीस स्टेशनच्या SHO धर्मवीर भारती यांनी सांगितलं की, चार लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांना लवकरच अटक करण्यात येईल. सध्या चौकशी सुरू आहे. आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल.