पायल तडवीसारखा घडला प्रकार; नायर रुग्णालयात आणखी एका डॉक्टरने केली आत्महत्या
By पूनम अपराज | Published: February 16, 2021 02:47 PM2021-02-16T14:47:43+5:302021-02-16T14:53:31+5:30
Suicide : नायर रुग्णालयात काल रात्री ही घटना घडली. आग्रीपाड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या नायर रुग्णालयात डॉक्टरने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. खोलीतून डॉक्टरचा मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार डॉ. भीमसंदेश तुपे (२६) तीन दिवसांपूर्वी वडिलांना भेटायला औरंगाबादला गेले होते. त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. शनिवारी औरंगाबादहून परत आल्यानंतर रविवारी दिवसभर त्यांनी रुग्णालयात काम केले होते.
खोलीत केली आत्महत्या
सायंकाळी डॉ. तुपे आपल्या खोलीत परत आले तेव्हा त्याने स्वतःला इंजेक्शन मारून घेऊन आत्महत्या केली बराच वेळ दार ठोठावले, पण त्याने उघडले नाही. त्यानंतर दरवाजा तोडला तेव्हा त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही माहिती रुग्णालय प्रशासनाला त्याच्या खोलीतील दुसर्या सहयोगी डॉक्टरांनी दिली.
नायर रुग्णालयात काल रात्री ही घटना घडली. आग्रीपाड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या डॉक्टरने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. डॉ. तुपे नायर रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षणाचे विद्यार्थी होते. काल रात्री त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. त्यांच्या खोलीत त्यांचा मृतदेह आढळून आला. हा तरुण डॉक्टर नायर रुग्णालयात एनस्थेशिया म्हणजेच भूल देणारा डॉक्टर होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. वडिलांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर डॉ. तुपे नायर रुग्णालयात परतले. काल दिवसभर त्यांनी रुग्णालयात नेहमीप्रमाणे काम केलं. रा
तो ज्या खोलीत झोपतो, ती खोली सकाळी बऱ्याच वेळेपर्यंत बंद होता. खोलीचं दार ठोठावूनही आतून काहीही उत्तर आलं नाही. त्यामुळे काही जणांनी मिळून खोलीचं दार उघडलं. तेव्हा डॉक्टर तुपे हे मृतावस्थेत आढळून आले, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भारमल यांनी दिली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.पोलिसांनी पंचनामा करुन त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
Maharashtra: A 26-year-old doctor allegedly died by suicide at Nayar Hospital in Mumbai. His body was found in his room & has been sent for postmortem. Reason behind the suicide yet to be ascertained. Police registered an Accidental Death Report. Further investigation is underway
— ANI (@ANI) February 16, 2021
डॉ. पायल तडवीने २२ मे २०१९ रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केल्यामुळे पोलिसांनी गुन्हा नोंदवून नायर हॉस्पिटलमधील तिच्या तीन सहकारी महिला डॉक्टरांना अटक केली होती. यामध्ये डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांचा समावेश आहे. आग्रीपाडा पोलिसांनी तिन्ही डॉक्टरांवर रॅगिंग आणि ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.