खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 16:00 IST2020-06-25T15:53:40+5:302020-06-25T16:00:13+5:30
सियाने अलीकडेच तिचा डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यामध्ये ती पंजाबी गाण्यांवर नाचताना दिसत आहे.

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...
मनोरंजन विश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. १६ वर्षीय सिया कक्कडने गुरुवारी आत्महत्या केली. सियाने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचा पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. सियाने अलीकडेच तिचा डान्स व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यामध्ये ती पंजाबी गाण्यांवर नाचताना दिसत आहे.
बुधवारी रात्री सियाचा मॅनेजर अर्जुन सरीन यांच्या मते, एका गाण्याच्या संदर्भात सियाशी त्याची बातचीत झाली होती. ती चांगल्या मूडमध्ये होती आणि ठीक होती. मॅनेजरने सांगितले की, सियाने हे पाऊल उचलले याबाबत नेमकं काय घडले हे मला ठाऊक नाही .
सियाचे इन्स्टाग्रामवर ९१ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. TikTokवर सियाचे १. १ मिलियन फॉलोअर्स आहेत. सिया फक्त 16 वर्षांची होती. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जूनला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांत मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमीतून आला होता. बऱ्याच संघर्षानंतर त्यांनी बॉलिवूडचा प्रवास केला होता. त्याची स्वप्ने मोठी होती. त्याने आत्महत्या का केली याबद्दल पोलीस तपास करत आहेत. मात्र, सुशांतनंतर सियाच्या आत्महत्येने तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता
Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई
लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार
विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात