VIDEO: वाचवा वाचवा! ती मदतीसाठी आक्रोश करत होती; तरुण तिच्या कानशिलात लगावत होता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 05:47 PM2021-09-14T17:47:23+5:302021-09-14T17:47:40+5:30

थप्पड गर्लनंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल; तरुणीवर छेडछाडीचा आरोप

after thappad girl youth video viral slapping and kicking a girl in lucknow | VIDEO: वाचवा वाचवा! ती मदतीसाठी आक्रोश करत होती; तरुण तिच्या कानशिलात लगावत होता

VIDEO: वाचवा वाचवा! ती मदतीसाठी आक्रोश करत होती; तरुण तिच्या कानशिलात लगावत होता

Next

लखनऊ: गेल्या महिन्यात एका कॅब चालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. भरचौकात एका तरुणीनं कॅब चालकाला मारहाण केली होती. त्याच्या कानशिलात लगावल्या होत्या. त्यानंतर एक महिला टेम्पो चालकाला चपलेनं मारत असल्याचा व्हिडीओ समोर आला. यानंतर आता उत्तर प्रदेशातल्या लखनऊमध्ये अका तरुणानं तरुणीच्या कानशिलात लगावल्याची घटना समोर आली आहे. 

चारबाग मेट्रो स्टेशनच्या खाली घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका तरुणानं तरुणीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तरुणी मदतीसाठी आक्रोश करत होती. मात्र उपस्थितांपैकी कोणीही तिच्या मदतीला आलं नाही. तरुणीला मारहाण होत असताना सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. काहींनी हा प्रकार फोनमध्ये रेकॉर्ड केला. व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांना जाग आली आणि त्यांनी आरोपीला अटक केली.

मेट्रो स्टेशनच्या खाली, वर्दळ असलेल्या परिसरात तरुणीला मारहाण झाल्याची घटना घडली. तरुणी मदतीसाठी याचना करत होती. त्यावेळी तिथे महिला, पुरुष, मेट्रोचे गार्ड उपस्थित होते. काहींनी मारहाणीला विरोध केला. मात्र तरुणीची सुटका करण्यात त्यांना अपयश आलं.

तरुण तरुणीला मारहाण करत असताना पिवळ्या रंगाचं टीशर्ट घातलेला एक तरुण पुढे सरसावला. त्यानं मारहाणीला विरोध करत तरुणीची सुटका केली. त्याला आरोपीनं शिवीगाळ केली. त्यानंतर तो तिथून निघून गेला. चारबाग नाक्यावर पोलीस कर्मचारी कायम तैनात असतात. मात्र या घटनेची माहिती पोलिसांना व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मिळाली.
 

Web Title: after thappad girl youth video viral slapping and kicking a girl in lucknow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.