कोर्टाच्या आदेशानंतर ६ महिन्यापूर्वी दफन केलेल्या ‘त्या’ मुलीची हाडं बाहेर काढली, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 06:08 PM2022-02-05T18:08:41+5:302022-02-05T18:09:05+5:30

कल्याण गोविंदवाडी परिसरात राहणारे छोटू साहानी यांची दीड वर्षाची मुलगी नेहा ही तापाने आजारी पडली. तिला उपचारासाठी सहानी यांनी सूचकनाका येथील डॉक्टर आलम यांच्याकडे नेले असता डॉक्टरांनी औषधे दिली.

After the court order, the bones of one and half year girl who was buried 6 months ago were taken out at Kalyan | कोर्टाच्या आदेशानंतर ६ महिन्यापूर्वी दफन केलेल्या ‘त्या’ मुलीची हाडं बाहेर काढली, मग...

कोर्टाच्या आदेशानंतर ६ महिन्यापूर्वी दफन केलेल्या ‘त्या’ मुलीची हाडं बाहेर काढली, मग...

googlenewsNext

कल्याण - सहा महिन्यापूर्वी तापामुळे मृत्यू झालेल्या दीड वर्षाच्या मुलीचा दफन केलेला मृतदेहाची हाडे न्यायालयाच्या आदेशानुसार बाहेर काढण्यात आली आहे. ही हाडे कलिना येथील फॉरेन्सिक लॅबला तपासणीकरीता पाठविण्यात आली आहे. तपासणी अहवाल येताच मुलीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला होता ही बाब उघड होणार आहे.

कल्याण गोविंदवाडी परिसरात राहणारे छोटू साहानी यांची दीड वर्षाची मुलगी नेहा ही तापाने आजारी पडली. तिला उपचारासाठी सहानी यांनी सूचकनाका येथील डॉक्टर आलम यांच्याकडे नेले असता डॉक्टरांनी औषधे दिली. मुलीचा ताप उतरत नसल्याने तिची तब्येत बिघडली. ७ जुलै २०२१ रोजी नेहाचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यू प्रकरणी साहानी यांनी टिळकनगर आणि कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. मुलीला महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले होते. मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन न करताच तिचा मृतदेह दफन करण्यात आला.

मुलीच्या मृत्यूस डॉक्टरसह त्याचा साथीदार जबाबदार असल्याचा आरोप साहानी यांनी केला. या प्रकरणी त्यांनी कल्याण न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशापश्चात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र दरम्यान डॉक्टरसह त्याच्या साथीदाराला न्यायालयाने अंतिम जमीन मंजूर केला. दरम्यान न्यायालयाकडे मुलीचा मृतदेह बाहेर काढून त्याची तपासणी केली जावी अशी मागणी तिच्या पालकांनी केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर  ३ जानेवारी २०२२ रोजी नायब तहसीलदार सुषमा बांगर यांच्या उपस्थित पोलिस आणि तज्ञ डॉक्टरांनी मुलीला ज्या ठिकाणी दफन केले होते. त्याठिकाणी जाऊन मुलीची हाडांचे सॅम्पल घेतले. ते कलिना येथील फॉरेन्सिक लॅबला पाठविला आहेत. फॉरेन्सीक लॅबचा अहवालातून मुलीच्या मृत्यूचे सत्य बाहेर येऊ शकते अशी आपेक्षा मुलीच्या पालकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: After the court order, the bones of one and half year girl who was buried 6 months ago were taken out at Kalyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.