बलात्कार पीडितेला बापानेच गळा दाबून मारलं; भावाने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 02:41 PM2022-04-01T14:41:39+5:302022-04-01T15:32:44+5:30
Murder Case : 11 मार्च रोजी रात्री मुलीची हत्या करण्यात आली होती.
उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यात एका कलियुगी पित्याने लोकांच्या लज्जेच्या भीतीने बलात्काराची शिकार झालेल्या आपल्याच मुलीचा गळा दाबून खून केला. 14 मार्च रोजी कोल्हुई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील कालव्याच्या सायफनमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. 11 मार्च रोजी रात्री मुलीची हत्या करण्यात आली होती.
घटनेच्या रात्री 12 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तरुण फरार झाला. मुलीच्या वडिलांना हा प्रकार कळताच त्यांनी आपल्याच मुलीचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या बंधाऱ्यात फेकून दिला आणि घटनेवेळी उपस्थित असलेल्या मुलाला कोणाला काही सांगू नका, अशी सूचना केली. काही दिवसांनंतर मुलीच्या भावाने स्वतःच्या वडिलांविरुद्ध सर्व काही पोलिसांना सांगितले.
भावाने उघडले खुनाचे गुपित
प्रत्यक्षात संशयाची सुई नातेवाइकांवर फिरल्याने भाऊ आणि वडिलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता त्यांच्या बोलण्यात विरोधाभास दिसून आला. आतापर्यंत या हत्येची सगळी कहाणी या लोकांभोवतीच फिरत आहे, असे पोलिसांना वाटत होते. मुलीच्या भावाची कसून चौकशी केली असता त्याने सर्व गुपित उघड केले.