बंगालमधील आरजी कारनंतर आता हावडा जिल्हा रुग्णालय...! अप्लवयीन मुलीचं लैंगिक शोषण, टेक्निशियनचं किळसवाणं कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 02:55 PM2024-09-01T14:55:49+5:302024-09-01T14:57:04+5:30

याप्रकरणी आरोपीला अटकही करण्यात आली आहे...

After the RG car now Howrah District Hospital in west Bengal Sexual abuse of minor girl, act of technician | बंगालमधील आरजी कारनंतर आता हावडा जिल्हा रुग्णालय...! अप्लवयीन मुलीचं लैंगिक शोषण, टेक्निशियनचं किळसवाणं कृत्य

प्रतिकात्मक फोटो

सरकारी आरजी कर रुग्णालयातील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरी अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर पश्चिम बंगालसह संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. पश्चिम बंगालमधील महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात विरोधकांकडून ममता सरकारला लक्ष्य केले जात आहे. या मुद्द्यावरून भाजप ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. यातच आता, हावडा जिल्हा रुग्णालयात एका अल्पवयून मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपीला अटकही करण्यात आली आहे.

हावड जिल्हा रुग्णालयात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण -
गेल्या 28 ऑगस्तला एका 12 वर्षांच्या मुलीला छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पीडितेला शनिवारी (31 ऑगस्ट) सीटी-स्कॅनसाठी घेऊन जात असताना एका टेक्निशियनने तिच्यासोबत गैरवर्तन केले. प्रकरणाची माहिती मिळताच हावडा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी एका आरोपीला अटकही केली आहे.

पश्चिम बंगालच्या परगना येथील मध्यमग्राममध्येही अल्पवयीन मुलीचा विनयभंग - 
याशिवाय, पश्चिम बंगालच्या परगना येथील मध्यमग्राममध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर येथील संतप्त जमावाने आरोपीच्या घराची आणि त्याच्या नातेवाईकाच्या दुकानाची तोडफोड केली. यावेळी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अमित मालवीय यांची उपस्थित केला सवाल -
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी पश्चिम बंगालमधील महिलांवरील अत्याचारावरून ममता सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, "पश्चिम बंगालमध्ये सप्टेंबर 2024 च्या पहिल्याच दिवशी लैंगिक अत्याचाराच्या चार नव्या प्रकरणांची नोंद झाली. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना पश्चिम बंगाल हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित राज्य आहे. त्यांनी बलात्कार आणि पॉक्सो प्रकरणातील आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी कठोर नियमांची अंमलबजावणी आणि  जलदगती न्यायालये स्थापन करण्यासाठी कोणतेही काम केलेले नाही. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा.

 

Web Title: After the RG car now Howrah District Hospital in west Bengal Sexual abuse of minor girl, act of technician

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.