युट्यूबवर पाहून तरुणी करत अबॉर्शन अन् खालावली तब्येत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 19:36 IST2021-09-28T19:35:06+5:302021-09-28T19:36:23+5:30
Crime News : एक २५ वर्षीय मुलगी यूट्यूबवर व्हिडिओ पाहिल्यानंतर घरी गर्भपात (अबॉर्शन) करण्याचा प्रयत्न करत होती

युट्यूबवर पाहून तरुणी करत अबॉर्शन अन् खालावली तब्येत
युट्यूबवर व्हिडीओ पाहून घरी काही पदार्थ तसेच अनेक कृती करण्याचा ट्रेंड अलीकडे खूप वाढला आहे, पण तो किती धोकादायक असू शकतो ही बाब समोर आली आहे. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये एका तरुणीला युट्युबवर पाहून अबॉर्शन करणं महागात पडलं. एक २५ वर्षीय मुलगी यूट्यूबवर व्हिडिओ पाहिल्यानंतर घरी गर्भपात (अबॉर्शन) करण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर तिची प्रकृती खालावली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुलीला तिच्या प्रियकराने असं करण्याचा सल्ला दिला होता. मुलीने पोलिसांना सांगितले आहे की, तिचा प्रियकर 2016 पासून तिच्यावर बलात्कार करत आहे आणि लग्नाचे आश्वासन देत आहे. आता ती गरोदर राहिल्याने, तिच्या बॉयफ्रेंडने तिला यूट्यूबवरून व्हिडिओ पाहून आणि तिने सांगितलेली औषधे घेऊन गर्भपात करण्याचा सल्ला दिला.
जेव्हा मुलीने असे करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मुलगी रुग्णालयात आहे, ही बाब गेल्या गुरुवारची आहे. स्थानिक पोलिसांनी आता मुलीच्या प्रियकराला अटक केली आहे . त्याच्यावर बलात्काराचा आरोप आहे.