दिपनगरमध्ये पुन्हा गोळीबार, ठेकेदार मुकेश तिवारी सुदैवाने बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 04:08 PM2019-10-10T16:08:10+5:302019-10-10T16:10:59+5:30

शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Again Firing in Deepnagar, contractor Mukesh Tiwari fortunately survived | दिपनगरमध्ये पुन्हा गोळीबार, ठेकेदार मुकेश तिवारी सुदैवाने बचावले

दिपनगरमध्ये पुन्हा गोळीबार, ठेकेदार मुकेश तिवारी सुदैवाने बचावले

Next
ठळक मुद्देरविवारी रात्री शहरात झालेल्या गोळीबारात पाच लोकांची हत्या करण्यात आली. संशयित आरोपी दिपक मधुकर हाताले (38) हा काही साथीदारांसह कॉन्ट्रॅक्टर मुकेश शैलेंद्र तिवारी यांच्या दीपनगर येथील निवास्थानी आला.

भुसावळ - दीपनगर येथील राखेचे ठेकेदार मुकेश तिवारी यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, झटापटीत एक गोळी बाहेर पडली. ही घटना गुरुवार रोजी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास घटना घडली. व्यावसायिक वादातून ही घटना घडली असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरापूर्वी दिपनगर गेटसमोरील हॉटेल त्रिमूर्तीसमोर गोळीबार करण्यात आला होता. तसेच रविवारी रात्री शहरात झालेल्या गोळीबारात पाच लोकांची हत्या करण्यात आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

संशयित आरोपी दिपक मधुकर हाताले (38) हा काही साथीदारांसह कॉन्ट्रॅक्टर मुकेश शैलेंद्र तिवारी यांच्या दीपनगर येथील निवास्थानी आला. यावेळी त्यांनी घराच्या मागील बाजूस फटाक्यांची आतषबाजी केली. तर हातेले हा तिवारी यांच्या घरात शिरला आणि त्यांच्या डोक्याला बंदूक लावली. यावेळी तिवारी व हताले यांच्यात झटापट झाली. झटापटीमध्ये पिस्तूल खाली पडली. त्यामुळे तिवारी यांचा प्राण वाचला. पोलिसांनी दीपक हाताले यास ताब्यात घेतले. तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, कर्मचारी व अधिकारी दाखल झाले. या घटनेमुळे पुन्हा दिपनगरसह शहरात एकच खळबळ उडाली.

Web Title: Again Firing in Deepnagar, contractor Mukesh Tiwari fortunately survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.