पुन्हा मंत्रालयासमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 05:14 PM2018-07-25T17:14:24+5:302018-07-25T17:15:07+5:30
सावकाराच्या जाचाला कंटाळून, सरकारकडून दाद न मिळाल्याने उस्मानाबादमधील महिलेने घेतला असा निर्णय
मुंबई - आज पुन्हा एकदा मंत्रालयाच्या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे. सावकारच्या त्रासाला कंटाळून अलकाबाई कारंडे (वय - ३९) या महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, मंत्रालयाच्या गार्डन गेटवर असलेल्या पोलिसांनी वेळीच धावपळ करत महिलेला त्याब्यात घेतले आणि म्हणूनच अनर्थ टळला.
सावकाराच्या जाचाला कंटाळून एका महिलेने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. अलकाबाई कारंडे असे या महिलेचे नावं आहे. अलकाबाई या उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील शिरगिरवाडी गावी राहणाऱ्या आहेत. मंत्रालयाच्या गार्डनवर असलेल्या पोलिसांनी या महिलेला वेळीच ताब्यात घेतला म्हणून अनर्थ टळला. याप्रकरणी मारिन ड्राईव्ह पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे. सावकाराच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अलकाबाई यांनी आत्महत्या करण्याचे ठरविले. सावकारपासून होणाऱ्या त्रासाबद्दल याआधी पत्र लिहून मदत करण्याची विनंती अलकाबाई कारंडे यांनी केली होती. मात्र, सरकारकडून दाद न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे.