पुन्हा अभिनेता अरमान कोहलीविरोधात गुन्हा; महिला सहकलाकाराशी केली गैरवर्तणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 08:35 PM2018-12-04T20:35:24+5:302018-12-04T20:37:39+5:30
यापूर्वी गुन्हा दाखल झाल्याने कोहली अडचणीत आला होता. असं असताना पुन्हा एकदा अरमान कोहलीने महिला सहकलाकाराशी गौरवर्तणूक केल्यापरकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अरमान कोहलीच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे.
मुंबई - बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉसमधील स्पर्धक अरमान कोहलीविरोधात मैत्रिणीला मारहाण केल्याप्रकरणी यापूर्वी गुन्हा दाखल झाल्याने कोहली अडचणीत आला होता. असं असताना पुन्हा एकदा अरमान कोहलीने महिला सहकलाकाराशी गौरवर्तणूक केल्यापरकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अरमान कोहलीच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे.
महिला सहकलाकाराशी गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी अरमान आणि त्याचा मित्र दिलीप राजपूत यांच्याविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. जुहू परिसरात राहणारी तक्रारदार महिला सिनेसृष्टीत छोट्या मोठ्या भूमिका करते. त्यामुळे तिची पूर्वीपासून अरमानसोबत ओळख होती. ५ महिन्यांपूर्वी एका पार्टीदरम्यान अरमानने तक्रारदार महिलेची ओळख सहआरोपी दिलीप याच्याशी करून दिली होती. त्यानंतर दोघांमध्ये घनिष्ठ मैत्रीचे संबंध तयार झाले. कालांतराने दोघांनी एका प्रोजेक्टमध्ये ५० लाखांची गुंतवणूक केली. मात्र, हा प्रोजेक्ट समाधानकारक न झाल्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावरून २ डिसेंबर रोजी दिलीपने महिलेला फोन करून अश्लील शिवीगाळ केली. तर याबाबत अरमानला ही त्याने कल्पना दिली. त्यानंतर अरमानने पुन्हा महिलेला फोन करून तिच्याशी गैरवर्तवणूक करत अश्लील भाषा वापरली आणि धमकावले आहे. याप्रकरणी महिलेने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्याचप्रमाणे यापूर्वीही अरमानला त्याच्या मैत्रिणीली मारहाण केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली होती. या सर्व पकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिला सहकलाकाराशी गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी अरमान आणि त्याचा मित्र दिलीप राजपूत यांच्याविरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) December 4, 2018