पुन्हा लोकलवर अज्ञाताने मारला दगड; प्रवासी जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 06:39 PM2019-07-08T18:39:31+5:302019-07-08T18:41:18+5:30

विक्रोळी स्थानकात सहकारी प्रवाश्यांनी उतरवले जीआरपी कर्मचाऱ्यांच्या मदतीने राजावाडी रुग्णालयात आणले.

Against stine pelting on locals by unknown stone; passenger injured | पुन्हा लोकलवर अज्ञाताने मारला दगड; प्रवासी जखमी 

पुन्हा लोकलवर अज्ञाताने मारला दगड; प्रवासी जखमी 

googlenewsNext
ठळक मुद्देगणेश राम दरवडा हे रेल्वेत कुर्ला कार शेडमध्ये काम करतात. ही लोकल घाटकोपर येथून कल्याणच्या दिशेने निघाली असता घाटकोपरचा नित्यानंद पूल ओलांडला असताना अचानक समाजकंटकाने दगड फेकला.

मुंबई -   आज मुंबईत पुन्हा एकदा धावत्या लोकलवर समाजकांटकाने दगड फेकला आहे. यात एक प्रवासी जखमी झाला आहे. गणेश राम दरवडा हे रेल्वेत कुर्ला कार शेडमध्ये काम करतात. आपली ड्युटी संपवून कर्जतच्या दिशेने जात असताना त्यांनी विद्याविहार रेल्वे स्थानकावरून आसनगावला जाणारी लोकल पकडली. ही लोकल घाटकोपर येथून कल्याणच्या दिशेने निघाली असता घाटकोपरचा नित्यानंद पूल ओलांडला असताना अचानक समाजकंटकाने दगड फेकला. हा दगड लोकलमध्ये आतील सीटवर बसलेले गणेश यांना डोक्यात लागलाते.वेदनेने ते विव्हवळत होते. त्यांना विक्रोळी स्थानकात सहकारी प्रवाश्यांनी उतरवले जीआरपी कर्मचाऱ्यांच्या मदतीने राजावाडी रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. अजून एका प्रवाशाला हा दगड लागला. पण तो प्रवासी मात्र समोर निघून गेला असे गणेश यांनी सांगितले. तर या अगोदर रेल्वे प्रवाश्यांवर अनेक वेळा हल्ले झाले आहेत. मागील आठवड्यात दोन तरुणींना लोकलने प्रवास करत असताना याच ठिकाणी दगड मारला गेला होता. तर डोंबिवली येथे ही दारूची बाटली लागून जखमी झाल्या होत्या. यावरून मध्य रेल्वे प्रशासन प्रवाश्यांची सुरक्षा किती घेणार आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत रेल्वे प्रशासन कडक कारवाई करेल अशी ग्वाही मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले. 



 

Web Title: Against stine pelting on locals by unknown stone; passenger injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.