मूल होत नसल्याच्या कारणावरुन विवाहितेकडुन अघोरी पूजा; भिगवण येथील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 07:55 PM2020-06-29T19:55:42+5:302020-06-29T20:13:28+5:30
गेल्या काही दिवसांपासून अपत्यप्राप्तीसाठी परिसरात अघोरी प्रकार सुरु आहे.
बारामती : मूल होत नसल्याच्या कारणावरुन एका विवाहितेकडुन अघोरी पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार भिगवण (ता.इंदापुर) येथे उघडकीस आला आहे.याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात संबंधित विवाहितेने छळ आणि मुल होण्यासाठी अघोरीप्रकार केल्याची तक्रार दिली आहे.त्यानुसार पतीसह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये महिला मांत्रिक आणि तिच्या सहकारी महिलेचा देखील समावेश आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी कोमल नितीन कदम (वय.२१ धंदा.घरकाम रा . भिगवण वॉर्ड नं 2 , जाणता राजा चौक , ता इंदापुर जि. पुणे ) या विवाहितेने फिर्याद दिली आहे.त्यानुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पती नितीन दिलीप कदम ,सासरा दिलीप तुकाराम कदम ,सासु सिमा दिलीप कदम यांच्यासह सोलनकर महिला (पूर्ण नावमाहित नाही सर्व रा.भिगवण वॉर्ड नं २ ता. इंदापुर जि. पुणे ) स्वामी चिंचोली ता.दौंड जि पुणे )येथे राहणारी आरोपी नं ४ हिची सहकारी महिला पूर्ण नाव माहित नाही)अशा एकुण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ नोव्हेंबर २०१६ ते २७ जुन २०२० दरम्यान हा प्रकार विवाहितेच्या सासरी घडला आहे. पती आरोपी नितीन कदम,सासरा दिलीप कदम,सासु सीमा कदम यांनी संगनमत करून विवाहितेला मुलबाळ होत नसलेच्या कारणावरून वारंवार शारीरीक व मानसिक त्रास दिला. शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण करून जाचहाट केला तसेच इतर दोघी महिला आरोपींनी आपल्यामध्ये अलौकिक व अतेंद्रीय शक्ती आहे, असे भासवले. विवाहितेच्या मनात भिती बसवून त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागली नाहीस तर तुला मुल होणार नाही अशी भिती दाखविली.विवाहितेच्या डोक्याच्या केसाच्या दोन बटा अमानुषपणे उपटल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आला आहे.याप्रकरणी अधिक तपास सहायक फौजदार अविनाश काळे करीत आहेत.
दरम्यान,या घटनेची माहिती समजताच बारामती येथील अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली.अंनिसचे बारामती तालुका कार्याध्यक्ष विपुल पाटील यांनी 'लोेकमत' शी बोलताना सांगितले कि, गेल्या काही दिवसांपुर्वी झारगडवाडी(ता.बारामती) येथे अघोरी पुजा करण्यात आली होती. अपत्यप्राप्तीसाठी परिसरात अघोरी प्रकार सुरु आहेत. त्या महिलेच्या डोक्यावरील केसाच्या बटा उपटण्यात आली आहे.तसेच त्या महिलेच्या अंगावर लिंबु कापल्याची माहिती मिळत आहे.समाजात असे प्रकार थांबण्याची गरज आहे. त्यासाठी समाजप्रबोधन आणि कडक कारवाईची गरज
पाटील यांनी व्यक्त केली.