लग्नानंतर सासरी जात होत नवी नवरी, रेल्वेत सासरच्या लोकांना विष देऊन झाली फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 12:37 PM2023-02-08T12:37:13+5:302023-02-08T12:37:52+5:30

Crime News : मीडिया रिपोर्टनुसार, सकाळी 7 वाजता रामफल गावाजवळ 3 लोक रेल्वे रूळावर दिसून आले. त्यांची रेल्वे स्टाफने मदत केली. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

Agra bride gives poison to in laws in the moving train | लग्नानंतर सासरी जात होत नवी नवरी, रेल्वेत सासरच्या लोकांना विष देऊन झाली फरार

लग्नानंतर सासरी जात होत नवी नवरी, रेल्वेत सासरच्या लोकांना विष देऊन झाली फरार

Next

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) आग्रामध्ये नव्या नवरीने एक खतरनाक कारनामा केला आहे. लग्न करून मरूधर एक्सप्रेसने सासरी जात असलेल्या नवरीने रेल्वेतच सासरच्या लोकांना विष दिलं आणि संधी बघून फरार झाली. घटनेनंतर सासरच्या लोकांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या सगळ्यांची स्थिती चांगली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सकाळी 7 वाजता रामफल गावाजवळ 3 लोक रेल्वे रूळावर दिसून आले. त्यांची रेल्वे स्टाफने मदत केली. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. असं सांगण्यात आलं की, त्यांच्यासोबत असलेल्या नवरीने सगळ्यांना काहीतरी खाण्यासाठी दिलं. ज्यानंतर त्यांची तब्येत बिघडली.

मीडिया रिपोर्टनुसार, मरूधर एक्सप्रेसने वाराणसीहून जयपूरकडे एक परिवार जात होता. परिवारासोबत नवी नवरी होती. परिवाराला नव्या नवरीने प्रवासात नशेचा पदार्थ मिक्स करून काही खाण्यास दिलं. ज्यामुळे सगळे लोक बेशुद्ध झाले. सगळ्या लोकांना रामफळ गावाजवळ रेल्वे रूळाच्या बाजूला उतरून देण्यात आलं.

रेल्वे कर्मचाऱ्यांनी पीडित परिवाराला आग्रा फोर्ट स्टेशनला आणलं. त्यांना उपचारासाठी एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेच पीडित परिवाराने सांगितलं की, ते बनारसहून जयपूरला जात होते. त्यांच्यासोबत नवी नवरी होती. तिने आम्हाला काहीतरी खाण्यासाठी दिलं. ज्यामुळे आम्ही बेशुद्ध झालो. असं वाटतं या लग्नामुळे नवरी आनंदी नव्हती. त्यामुळे तिने हे कृत्य केलं. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

Web Title: Agra bride gives poison to in laws in the moving train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.