फ्रेन्डसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती फूड ब्लॉगर रितिका, पतीने हात पाय बांधून चौथ्या मजल्यावरून फेकल...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 01:53 PM2022-06-25T13:53:06+5:302022-06-25T13:53:32+5:30

Agra Crime News : शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारात फ्लॅटमध्ये तीन तरूण आणि दोन महिला आल्या होत्या. त्यानंतर अपार्टमेंटमधील काही लोकांना काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि बाहेर येऊन पाहिलं तर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

Agra food blogger Ritika Singh husband threw her from fourth floor | फ्रेन्डसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती फूड ब्लॉगर रितिका, पतीने हात पाय बांधून चौथ्या मजल्यावरून फेकल...

फ्रेन्डसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती फूड ब्लॉगर रितिका, पतीने हात पाय बांधून चौथ्या मजल्यावरून फेकल...

googlenewsNext

Agra Crime News : उत्तर प्रदेशच्या आग्रामधील  ओम श्री प्लॅटिनम अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या 30 वर्षीय फॅशन आणि फूड ब्लॉगर रितिका सिंहला हात पाय बांधून खाली फेकलं, ज्यामुळे जागीच तिचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्टनुसार, रितिका पती आकाश गौतमला सोडून गेल्या तीन वर्षांपासून फेसबुक फ्रेन्ड विपुल अग्रवालसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. पोलिसांनी याप्रकरणी रितिकाचा पती आकाश गौतम आणि त्याच्यासोबत आलेल्या दोन महिलांसोबतच तिचा फेसबुक फ्रेन्ड विपुल यालाही ताब्यात घेतलं.

पोलिसांनी या घटनेची पूर्ण माहिती देताना सांगितलं की, ओम श्री प्लॅटिनम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सूचनेनंतर ताजगंज पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सांगितलं की, मृत महिलेचं नाव रितिका आहे. जी विपुल अग्रवालसोबत लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. त्यांनी सांगितलं की, विपुलची पत्नीसोबत घटस्फोटाची केस सुरू आहे.

त्यांनी सांगितलं की, शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारात फ्लॅटमध्ये तीन तरूण आणि दोन महिला आल्या होत्या. त्यानंतर अपार्टमेंटमधील काही लोकांना काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि बाहेर येऊन पाहिलं तर महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली.
पोलिसांनी याप्रकरणात कथितपणे सहभागी दोन महिला सुनीता आणि सुशीलासोबत आकाश गौतमला ताब्यात घेतलं. पोलिसांनी सांगितलं की, यासोबतच विपुललाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. लोकांची चौकशी केली जात आहे.

मूळची गाजियाबादच्या विजय नगरची राहणारी रितिकाचं 2014 मध्ये आकाश गौतमसोबत लव्ह मॅरेज झालं होतं. लग्नानंतर दोघेही फिरोजाबादमध्ये राहत होते. इथे पती आकाश कोचिंग क्लासेस घेत होता. त्यानंतर ते आग्र्याला शिफ्ट झाले. दरम्यान 2017 मध्ये फेसबुकवर रितिकाची मैत्री अग्रवालसोबत झाली. विपुल आधीच विवाहित होता. आकाशला दोघांच्या नात्याचा संशय आला. ज्यावरून त्यांच्या भांडण होत होतं. यानंतर 2019 मध्ये रितिका पती आकाशला सोडून विपुलसोबत लिव इनमध्ये राहू लागली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश शुक्रवारी 11 वाजता दोन महिलांना सोबत घेऊन ओम श्री प्लॅटिनम अपार्टमेंटमध्ये आला आणि रितिकाने दरवाजा उघडताच तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांसोबत मिळून विपुलचे हाय पाय बांधून त्याला बाथरूममध्ये बंद केलं. पुन्हा रितिकाला मारहाण केली.

विपुलने पोलिसांना सांगितलं की, आकाश आणि त्याच्या काही साथीदारांनी रितिकाचे हात पाय बांधले आणि गळ्यात दोरी बांधून तिला बाल्कनीतून खाली फेकलं. विपुलनुसार, ते लोक त्यालाही मारणार होते. पण त्याने बाथरूमचा दरवाजा तोडून आरडाओरड सुरू केली होती. ज्यामुळे आजूबाजूचे लोक तिथे जमा झाले होते. त्यांना पाहून हे लोक पळू लागले होते. मात्र, लोकांनी आकाश आणि दोन महिलांना पकडलं.

Web Title: Agra food blogger Ritika Singh husband threw her from fourth floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.