धक्कादायक! गर्लफ्रेन्डने घरी बोलवून बॉयफ्रेन्डवर केला Acid Attack, उपचारादरम्यान मृत्यू....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 09:39 AM2021-03-26T09:39:45+5:302021-03-26T09:40:03+5:30
आरोपी तरूणीचं नाव सोनम आहे. ती आग्र्यातील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. तेच पीडित तरूण देवेंद्र एक पॅथॉलॉजीमध्ये असिस्टंट म्हणून जॉब करतो.
(Image Credit : indiatimes.com)
उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये एका गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डवर अॅसिड अटॅक (Girlfriend Acid Attack On Boyfriend) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामागचं कारण समोर आलं की, बॉयफ्रेन्ड हा दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार होता म्हणून गर्लफ्रेन्डने दगाबाज बॉयफ्रेन्डवर अॅसिड फेकलं.
आरोपी तरूणीचं नाव सोनम आहे. ती आग्र्यातील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. तेच पीडित तरूण देवेंद्र एक पॅथॉलॉजीमध्ये असिस्टंट म्हणून जॉब करतो. दोघेही बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. पोलिसांनी सांगितले की, जेव्हा देवेंद्रने एका दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याची गर्लफ्रेन्ड सोनम भडकली. याच रागात तिने हे धक्कादायक पाउल उचललं. सोनमने गुरूवारी देवेंद्रवर अॅसिड हल्ला केला. (हे पण वाचा : गुंगीचे औषध घातलेले ज्यूस पाजून डॉक्टर महिलेवर बलात्कार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी)
काय झालं त्या दिवशी?
आग्र्याचे एसपी रोहन यांनी सांगितले की, हे कृत्य करण्यासाठी सोनमने पीडित देवेंद्रला काही कारण देत आपल्या घरी बोलवलं होतं. सोनम त्याला म्हणाली होती की, माझ्या घरातील फॅन खराब झाला आहे. तो ठीक करण्यात तुझी मदत हवी आहे. जसा देवेंद्र तिच्या घरी पोहोचला तिने त्याच्यावर अॅसिड फेकलं.
ते म्हणाले की, घटनेनंतर लगेच देवेंद्रला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण अॅसिडमध्ये तो पूर्णपणे जळाल्याने त्याचा जीव वाचू शकला नाही. देवेंद्रने हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. (हे पण वाचा : परस्त्रीशी संबंध का ठेवतो?, असा जाब विचारणाऱ्या शेजाऱ्यावर युवकाने केला विळ्याने हल्ला )
आरोपी तरूणीही जळाली
पोलिसांनी आरोपी तरूणी सोनमला अटक केली आहे. अॅसिड हल्ला करत असताना ती सुद्धा जखमी झाली. तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलमधून सोडल्यावर तिच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.