जिगोलो बनवण्याच्या नावाखाली तरूणांची फसवणूक, मजा अन् मोठ्या कमाईचं देत होते आमिष

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 12:22 PM2021-08-11T12:22:08+5:302021-08-11T12:26:18+5:30

जिगोलो बनवण्याचं खोटं सांगून फसवणूक करणाऱ्या गॅंगचा मुख्य आरोपी भोला कुमार आहे. तो बिहारचा राहणारा असून त्याची मैत्री आग्र्यातील सोनू शर्मासोबत झाली होती.

Agra police arrested 3 people for online duping unemployed youth in name of giving them job of gigolo playboy | जिगोलो बनवण्याच्या नावाखाली तरूणांची फसवणूक, मजा अन् मोठ्या कमाईचं देत होते आमिष

जिगोलो बनवण्याच्या नावाखाली तरूणांची फसवणूक, मजा अन् मोठ्या कमाईचं देत होते आमिष

Next

आग्र्यामध्ये जिगोलो(प्लेबॉय) बनवण्याचं खोटं सांगत लाखो रूपये लुटणाऱ्या गॅंगचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी सांगितलं की तरूणीची मसाज करण्याची ऑनलाइन जाहिरात देऊन ते तरूणांना जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशनच्या नावावर पैसे उकळत होते. आतापर्यंत आरोपींच्या गॅंगने जिगोलो बनण्याची इच्छा असणाऱ्या जवळपास १०० तरूणांकडून लाखो रूपये लुटले आहेत.

जिगोलो बनवण्याचं खोटं सांगून फसवणूक करणाऱ्या गॅंगचा मुख्य आरोपी भोला कुमार आहे. तो बिहारचा राहणारा असून त्याची मैत्री आग्र्यातील सोनू शर्मासोबत झाली होती. आरोपींनी प्लेबॉय नावाने एक वेबसाइटही बनवली होती. तरूणांनी कॉल केल्यावर ते आधी त्यांचे फोटो मागवत होते. त्यानंतर तरूणांना सांगत होते की, तुम्ही फीट आहात, प्रत्येक रात्री काम मिळणार. अशा महिलांकडे जावं लागेल, ज्या एकट्या राहतात. मोठी कमाई होईल. याबाबत कुणाला काही सांगू नका. जर कुणाला सांगितलं की, क्लबमधून काढण्यात येईल. (हे पण वाचा : स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; ४ महिलांची सुटका)

सायबर सेल आणि पोलिसांनी गॅंगचा मास्टरमाइंड भोला कुमारसहीत मुकेश आणि सोनू शर्मा यांना अटक केली. पोलीस अधिकारी अजय कौशल यांनी सांगितलं की, आरोपींची चौकशी केल्यावर  आरोपी वेगवेगळ्या प्रकारे लोकांना फसवत असल्याचं समोर आलं. 

आरोपी म्हणाले  की, बेरोजगारांना जाळ्यात फसवणं फार सोपं आहे. आजकाल तरूण अशा कामाच्या शोधात असतात जिथे पैशांसोबत मजाही करायला मिळेल. यामुळेच ते ऑनलाइन प्लेबॉय क्लबचे सदस्य बनण्यासाठी दुसऱ्या राज्यातील वृत्तपत्रांमध्ये आणि इंटरनेटवर जाहिराती देत होते.

पोलिसांनी सांगितलं की, प्लेबॉयच्या वेबसाइटवर रजिस्ट्रेशनच्या नावावर एक फॉर्म भरावा लागत होता. रजिस्ट्रेशन फीस म्हणून तरूणांकडून ५ ते ३५ हजार रूपये मागवत होते. त्यानंतर फोन बंद करत होते. पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं की, बिहारचा राहणारा भोला कुमार आधी सायबर गुन्हेगारांच्या गॅंगमद्ये काम करत होता. त्यानंतर स्वत: त्याने हे काम सुरू केलं. त्याची मैत्री आग्र्यातील सोनूसोबत झाली. सोनूने मुकेश कुमारला तयार केलं आणि गॅंग बनवली.

गॅंगचा मास्टरमाइंड भोला कुमार खात्यात जमा होणाऱ्या रकमेतील अर्धी रक्कम स्वत: घेत होता. बाकी सोनू आणि मुकेशला देत होता. आरोपी लोन देण्याच्या नावावरही लोकांकडून पैसे लुटत होते. आतापर्यंत १० लाख रूपयांची लुट झाल्याचं समजलं आहे. आरोपींची बॅंक खातीही चेक केली जाईल. 
 

Web Title: Agra police arrested 3 people for online duping unemployed youth in name of giving them job of gigolo playboy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.