१५०० रुपयांची कार्यालयातच लाच घेताना कृषी सहाय्यकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 08:20 PM2022-03-24T20:20:26+5:302022-03-24T20:20:52+5:30
Bribe Case : ललितकुमार विठ्ठल देवरे (३२, रा.आनंद नगर, पाचोरा, जि.जळगाव) असे या लाच घेणाऱ्या कृषी सहायकाचे नाव आहे.
पाचोरा (जि.जळगाव) : कृषी योजनेत सबसीडी जमा केल्याच्या मोबदल्यात १५०० रुपयांची लाच घेणाऱ्या कृषी सहायकास रंगेहाथ पकडण्यात आले. गुरुवारी दुपारी पाचोरा कृषी अधिकारी कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
ललितकुमार विठ्ठल देवरे (३२, रा.आनंद नगर, पाचोरा, जि.जळगाव) असे या लाच घेणाऱ्या कृषी सहायकाचे नाव आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या आईच्या नावे कृषी यांत्रिकीकरण योजनेत पॉवर ट्रिलर मशीन घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. हा अर्ज तालुका कृषी अधिकाऱ्यांनी मंजूर झाला. या योजनेत ८५ हजार रुपयांच्या सबसिडीची रक्कम अर्जदाराच्या बॅंक खात्यात जमा झाली. ही रक्कम खात्यात जमा केल्याच्या मोबदल्यात देवरे याने १५०० रुपयांची लाच मागितली. ही रक्कम देवरे याने घेताच त्याला कार्यालयातच पकडण्यात आले.