अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा : ख्रिस्तियन मिशेलला जामीन मिळणार की नाही ठरणार ७ सप्टेंबरला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 05:27 PM2019-08-29T17:27:40+5:302019-08-29T17:29:04+5:30
Agusta Westland Helicopter Scandal: मिशेलच्या जामीन अर्जावर ७ सप्टेंबरला निकाल लागणार आहे.
नवी दिल्ली - अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची मुख्य आरोपी आणि ब्रिटीश नागरिक ख्रिस्तियन मिशेलला दुबईतून भारतात आणण्यात आले होते. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारातील मध्यस्थ व कंत्राटासाठी कंपनीकडून सुमारे २२५ कोटी रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप ख्रिस्तियनवर लावण्यात आला आहे. याप्रकरणातील मिशेलला भारतात लँड होताच सीबीआय अधिकाऱ्यांनी त्याला आपल्या ताब्यात घेतले आणि अटक केली होती. दिल्ली कोर्टात मिशेलने जामीन अर्ज दाखल केला असून त्यावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला आहे. मिशेलच्या जामीन अर्जावर ७ सप्टेंबरला निकाल लागणार आहे.
दुबई कोर्टाच्या प्रत्यार्पणानंतर ४ डिसेंबर २०१८ च्या संध्याकाळी यूएइने ख्रिस्तियन मिशेलला भारताच्या ताब्यात दिले. सीबीआयने रात्रीच मिशेल दिल्लीला आणले. त्यानंतर त्याला थेट सीबीआय कार्यालयात नेण्यात आले होते. या घोटाळ्यासंबंधी सीबीआय मिशेलची चौकशी करून अटक केली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजिल डोवाल यांच्यावर ख्रिस्तियन मिशेलच्या प्रत्यार्पणाची जबाबदारी सोपवली होती.
A Delhi Court reserves order on regular bail plea of alleged middleman Christian Michel in #AgustaWestlandCase. Order to be passed on 7th September. (File pic) pic.twitter.com/Z1LK8xOrMf
— ANI (@ANI) August 29, 2019