लग्नाला एक वर्ष होऊनही पतीने शारीरिक संबंध ठेवले नाही, महिलेने पोलिसात दिली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 12:43 PM2022-02-23T12:43:17+5:302022-02-23T12:43:36+5:30
Ahmedabad : महिलेच्या पतीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. महिला या गोष्टीमुळे वैतागली होती.
लग्नानंतर पती-पत्नीमध्ये वाद झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. अनेकदा हे वाद पोलीस स्टेशनपासून ते कोर्टाच्या दारापर्यंत पोहोचतात. काही वाद असे असतात जे पती-पत्नीपर्यंत राहतात. ते यात तिसऱ्या कुणाला येऊ देत नाहीत. अशातच पती-पत्नीच्या लैंगिक संबंधाबाबच्या एका घटनेची चर्चा होत आहे. लग्नानंतर शारीरिक संबंध ही पती-पत्नीच्या जीवनातील महत्वाची बाब असते. पण जर तेच नसेल तर काय?
अहमदाबादमधून (Ahmedabad) अशीच एक घटना समोर आली आहे. हे प्रकरण वरवर गमतीदार वाटत असलं तरी तसं नाहीये. कारण पत्नीने तिचा शारीरिक संबंधाचा अधिकार मिळवण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. महिलेच्या पतीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. महिला या गोष्टीमुळे वैतागली होती. त्यामुळे तिने पती विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
अहमदाबादमधील ३३ वर्षीय महिलेने साबरमती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करत न्यायाची मागणी केली आहे. महिलेने आरोप लावला की, लग्नाच्या एक वर्षानंतरही तिच्यात आणि पतीमध्ये संबंध झाले नाही. पतीकडे याबाबत अनेकदा मागणी करूनही अनेक गोष्टी तिला ऐकाव्या लागल्या आणि त्रासही सहन करावा लागला. अखेर वैतागून तिने पोलिसात पतीची तक्रार केली.
महिलेने पोलिसात दिलेल्या आपल्या तक्रारीत सांगितलं की, मी गेल्यावर्षी बडोद्यातील एका व्यक्तीसोबत लग्न केलं होतं. माझी आणि त्याची भेट एका मॅट्रिमोनिअल साइटवरून झाली होती. लग्न झाल्यावर सासरच्या लोकांनी मला एका वर्षातच मुलाला जन्म देण्याचा आदेश दिला. पण आतापर्यंत आमच्या शारीरिक संबंधच कायम झाले नाही. माझा पती रात्री अजब कपडे घालतो. मी जेव्हा त्याला शारीरिक संबंधाची मागणी करते तेव्हा तो म्हणतो की, मी तुझ्यासोबत संबंध ठेवू शकत नाही. या मुद्द्यावर मी जेव्हाही त्याच्यासोबत बोलते तेव्हा तो माझा गळा दाबतो आणि त्रास देतो.
२५ लाख रूपयांची मागणी
महिलेने पोलिसांना सांगितलं की, तिच्या पतीला आयव्हीएफच्या माध्यमातून मुल हवं आहे. 'माझा पती मला नेहमीच आयव्हीएफच्या माध्यमातून बाळाला जन्म देण्याबाबत बोलतो. मी याला नकार दिला तर त्याने मला जोरात धक्का दिला आणि मार्च २०२१ मध्ये त्याने मला सोडलं. मी माझ्या आई-वडिलांसोबत साबरमतीमध्ये राहते. आता मला परत बोलवण्यासाठी ते लोक २५ लाख रूपये हुंडा मागत आहे'.