नात्याला काळीमा! कोरोना झाला म्हणून नर्सला काढलं घराबाहेर; सासरच्यांनी केली तब्बल 10 लाखांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 12:19 PM2021-03-23T12:19:38+5:302021-03-23T12:19:55+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग झाल्याने एका नर्सला तिच्या कुटुंबियांनी घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि डॉक्टर्स कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याने एका नर्सला तिच्या कुटुंबियांनी घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गुजरातमधील अहमदाबादच्या इसनपूर भागात ही घटना घडली आहे. एका नर्सला कोरोना झाल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला घराबाहेर काढलं. तसेच सासरच्या मंडळींनी तिला घरात पुन्हा घेण्यासाठी तिच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली आहे. ज्यामुळे नर्स सध्या आपल्या माहेरी राहत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमधील इसनपूर भागात राहणाऱ्या 27 वर्षीय नर्सने याबाबत खोखरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत खोखरामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीशी 2020 मध्ये तिचा विवाह झाला.
नर्सने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नर्सचा ज्यावेळी विवाह झाला त्यावेळपासूनच ती मणिनगर येथील एलजी हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करत होती. सासरकडील मंडळींना तिचं हे काम करणं पसंत नव्हतं. त्यामुळे तिच्या सासरचे लोक तिला त्रास देत होते. एप्रिल 2020 मध्ये जेव्हा या नर्सला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समजलं त्यावेळी तिच्या पतीसह सासरच्या लोकांनी तिला घराबाहेर काढलं.
CoronaVirus News : नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने घेतला निर्णय; प्रशासनाच्या चिंतेत भरhttps://t.co/lb1sP24a9Q#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) March 19, 2021
घरी परत यायचं असेल तर 10 लाख रुपये सोबत आणावेत किंवा तलाक द्यावा असं नर्सला आता तिच्या सासरीच्या मंडळींनी सांगितलं आहे. मी माझ्या सासरच्या लोकांशी अनेकदा संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते समजून घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे मला दुःख झालं असून मी सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून मी माहेरी राहत असून, मला माझा पती भेटायला देखील आलेला नाही अशी माहिती त्या नर्सने दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने उचललं महत्वाचं पाऊलhttps://t.co/zQlHU31i7x#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia
— Lokmat (@MiLOKMAT) March 19, 2021