मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 05:55 PM2024-11-28T17:55:15+5:302024-11-28T17:56:58+5:30

मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी तिची आई आणि मावशीशी बोलली होती.

air india pilot case what did the srishti tuli uncle | मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

एअर इंडियाच्या २५ वर्षीय महिला पायलटच्या आत्महत्येप्रकरणी आता आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. एअर इंडियाची पायलट सृष्टी तिच्या मुंबईतील घरात मृतावस्थेत आढळली. मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी तिची आई आणि मावशीशी बोलली होती. त्यावेळी ती आनंदात होती. सृष्टी तुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केल्याचं कुटुंबीयांनी म्हटलं आहे. तिचा प्रियकर आदित्य पंडित याने तिचा छळ आणि विनयभंग केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

सृष्टीचे काका विवेक तुली यांनी एनडीटीव्हीला सांगितलं की, "पोलीस म्हणत आहेत की, तिने आत्महत्या केली. पण असं काय कारण होतं ज्यामुळे ती इतक्या टोकाला पोहोचली? आनंदाने ती तिची आई आणि मावशीशी बोलली होती, त्यानंतर १५ मिनिटांनी तिचा मृत्यू झाला. हे कसं झालं? तिने आपल्या आईला काय सांगितलं? तिने नेमकं काय केलं? पोलीस याचा शोध घेत आहेत." 

विवेक तुली यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आदित्यला अटक करण्यात आली आहे. कुटुंबीयांनी त्यांच्या तक्रारीत ही संपूर्ण घटना सुनियोजित हत्या असल्याचं म्हटलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की, आरोपींनी सृष्टीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा तिने तसे होऊ दिले नाही तेव्हा तिचा सर्वांसमोर अपमान करण्यात आला. मुंबईत एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या २५ वर्षीय पायलटचा मृतदेह तिचा अंधेरीतील फ्लॅटमध्ये सापडला.

या प्रकरणी पोलिसांनी हत्येला प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून बॉयफ्रेंडला अटक केली आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सृष्टीचे काका विवेक तुली यांच्या तक्रारीच्या आधारे पवई पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या एफआयआरमध्ये अशा अनेक वाक्यांचा उल्लेख करण्यात आला आहे की, जेव्हा आरोपी आदित्यने सृष्टीसोबत गैरवर्तन केलं, त्यामुळे ती नाराज झाली होती.

आणखी एका घटनेचा संदर्भ देत त्यांनी सांगितलं की, याच वर्षी मार्चमध्ये आदित्यने पुन्हा एकदा सृष्टीचा सर्वांसमोर अपमान केला होता. दोघे एकत्र जेवायला गेले असताना ही घटना घडली. रात्रीच्या जेवणादरम्यान सृष्टीने नॉनव्हेज खाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा आदित्यने तिला शिवीगाळ केली आणि सर्वांसमोर व्हेज खाण्यास भाग पाडलं. ही घटना सृष्टीने तिच्या मैत्रिणीलाही सांगितली होती. आदित्यने तिच्याशी कसं गैरवर्तन केलं आणि तिला रस्त्यावर कसं एकटं सोडलं हे तिने सांगितलं होतं.

Web Title: air india pilot case what did the srishti tuli uncle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.