तिघांमध्ये वाद, चर्चेनंतर पुन्हा एकत्र; पार्टीही झाली, त्यानंतर जे झालं, त्यानं पूर्ण शिर्डी हादरली!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 08:14 AM2021-09-09T08:14:51+5:302021-09-09T08:21:46+5:30

सदर घटनेनं संपूर्ण शिर्डी हादरून गेली आहे. 

Ajay Jagtap was murdered by two friends In Shirdi | तिघांमध्ये वाद, चर्चेनंतर पुन्हा एकत्र; पार्टीही झाली, त्यानंतर जे झालं, त्यानं पूर्ण शिर्डी हादरली!

तिघांमध्ये वाद, चर्चेनंतर पुन्हा एकत्र; पार्टीही झाली, त्यानंतर जे झालं, त्यानं पूर्ण शिर्डी हादरली!

Next

अहमदनगर: शिर्डीत एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. दोन आरोपींनी मिळून एका तरुणाची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिला आहे. अजय कारभारी जगताप या तरुणाचा खून झाला असून खून करणारे अक्षय सुधाकर थोरात (वय २४), रोहित बंडू खरात (२२) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटनेनं संपूर्ण शिर्डी हादरून गेली आहे. 

काही वर्षांपूर्वी शिर्डीतील भीमनगर येथे राहत असलेला अजय जगताप सध्या संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे राहत होता. बहिणीला भेटण्यासाठी तो शिर्डीत आला होता. तीन दिवसांपूर्वी अजय याचा अक्षय थोरात याच्याशी किरकोळ वाद झाला होता. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अजय जगताप वाद मिटविण्यासाठी अक्षय थोरात याच्या रिंगरोडवरील असलेल्या दुकानात गेला. अक्षय दुकानात राहतो. त्यावेळी त्यांच्यात चर्चा झाली. चर्चेत वादही मिटला. यावेळी रोहित खरात उपस्थित होता. वाद मिटल्यानंतर तिघांनी पार्टी केली. 

पार्टी झाल्यानंतर अक्षयने अजयला घरी जाण्यास सांगितले. मी इथेच झोपणार आहे, असे सांगत अजय लघुशंकेसाठी बाहेर गेला. लघुशंकेनंतर अजय पुन्हा दुकानात आला. त्यावेळी त्याच्या कमरेला कोयता असल्याचे अक्षय व रोहितच्या लक्षात आले. वादाच्या कारणावरून अजय आपल्याला मारेल या शंकेने अक्षय व रोहितने कोयता हिसकावून घेतला. त्यानंतर तत्काळ वार करून अजयचा खून केला. 

सदर घटनेनंतर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास अक्षय थोरात व रोहित खरात यांनी पोलीस ठाण्यात जाऊन खून केल्याची माहिती पोलिसांना दिली, अशी माहिती पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन खात्री केली. यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी रात्रीच घटनास्थळाला भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक रूपवते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ajay Jagtap was murdered by two friends In Shirdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.