रेल्वे ट्रॅकवर डोकं ठेवून 'त्याने' बनवला व्हिडीओ, म्हणाला - मृत GF स्वप्नात येऊन बोलवते, तिच्याकडे जातोय...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 01:00 PM2021-08-04T13:00:52+5:302021-08-04T13:05:03+5:30
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील मेडता रोडवरील रेण आणि जालसू रेल्वे स्टेशनच्या मधे एका तरूणाने त्याच्या प्रेयसीच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी ट्रेनखाली येऊन आत्महत्या केली.
ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीसाठी लोक वाट्टेल ते करायला तयार असतात. पण ती व्यक्तीच या जगात नसेल तर? काही लोक आपलं जीवन संपवतात तर काही लोक जुनं सगळं विसरून पुढे जातात. पण एका तरूणाने प्रेयसीसाठी जीव दिलाय. राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील मेडता रोडवरील रेण आणि जालसू रेल्वे स्टेशनच्या मधे एका तरूणाने त्याच्या प्रेयसीच्या मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी ट्रेनखाली येऊन आत्महत्या केली.
तरूणाचं नाव घनश्याम मेघवाल आहे. आत्महत्येनंतर तरूणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मृत्यूआधी त्याने ट्रेनच्या ट्रॅकवरच एक व्हिडीओ बनवला होता. ३ दिवसांआधी त्याच्या प्रेयसीचं निधन झालं होतं. यानंतर सोमवारी सायंकाळी रेण आणि जालसू स्टेशनच्या मधे ट्रॅकवर तरूणाने डोकं ठेवलं आणि आत्महत्या केली. (हे पण वाचा : Shocking! सासूने ५ लाखांची सुपारी देऊन केली जावयाची हत्या, कारण वाचून चक्रावून जाल)
व्हिडीओ आत्महत्या करण्याच्या थोड्या वेळा पूर्वीचा आहे. रेल्वे ट्रॅकवर बसून रेकॉर्ड केलेल्या या व्हिडीओ तरूण म्हणाला की, काही दिवसांपूर्वीच त्याचं एका तरूणीसोबत फोनवर बोलणं सुरू झालं होतं. त्यानंतर तो तिच्या प्रेमात पडला. दोघांची जात वेगवेगळी होती. त्याने सांगितलं की ३ दिवसांआधी तरूणीने त्याला न सांगता आत्महत्या केली. आता ती रोज त्याच्या स्वप्नात येते आणि बोलवते. त्यामुळे तो तिच्याजवळ जात आहे. त्याने परिवाराला एक संदेश दिला की, त्याच्या हातातील ब्रेसलेट आणि अंगठी घरात सांभाळून ठेवा.
घनश्यामने व्हिडीओत सांगितलं की, प्रेयसीशिवाय त्याने तीन दिवस काढले. हे दिवस फार कठिण होते आणि आता तो तिच्याशिवाय एक क्षणही जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे तो जीव देऊन प्रेयसीजवळ जात आहे. तो हेही म्हणाला की, माझ्या मृत्यूसाठी कुणालाही जबाबदार धरू नका. तो कुणाच्या दबावाशिवाय आपल्या प्रेमासाठी जीव देत आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.