समाजवादी पक्षाचा पराभव जिव्हारी लागला; अखिलेश यादवांच्या कार्यकर्त्याचं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 01:39 PM2022-03-11T13:39:21+5:302022-03-11T13:41:54+5:30

Suicide Attempt : नरेंद्रने बुधवारी एक व्हिडिओ व्हायरल केला होता, ज्यामध्ये त्याने 2022 मध्ये सपाचे सरकार न आल्यास विष प्राशन करून आत्महत्या करू, असे म्हटले होते.

Akhilesh Yadav's party's defeat hurt the young man have poison, health is serious | समाजवादी पक्षाचा पराभव जिव्हारी लागला; अखिलेश यादवांच्या कार्यकर्त्याचं टोकाचं पाऊल

समाजवादी पक्षाचा पराभव जिव्हारी लागला; अखिलेश यादवांच्या कार्यकर्त्याचं टोकाचं पाऊल

googlenewsNext

लखनौ - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) पुन्हा स्पष्ट बहुमत मिळविले आहे. दरम्यान, राजधानी  लखनौमधील चिन्हाट येथे राहणाऱ्या तरुणाने गुरुवारी संध्याकाळी विषारी द्रव्य प्राशन केले. माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने लोहिया रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय यादव उर्फ ​​नरेंद्र (वय 40, रा. चिन्हाटच्या कामटा येथे राहणारा) कुटुंबासह राहतो. विभूतीखंडमधील अवध बसस्थानकाशेजारी असलेल्या पारिजात अपार्टमेंटसमोर तो चहाची टपरी लावतो.

नरेंद्रने बुधवारी एक व्हिडिओ व्हायरल केला होता, ज्यामध्ये त्याने 2022 मध्ये सपाचे सरकार न आल्यास विष प्राशन करून आत्महत्या करू, असे म्हटले होते. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी पारिजात अपार्टमेंटजवळ विषारी द्रव्य प्राशन केले. रस्त्यात त्याला होणारा त्रास पाहून आजूबाजूच्या लोकांनी या प्रकरणाची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, नरेंद्र अनेक दिवसांपासून चहाची टपरी चालवत नव्हता.



विभूतीखंडचे इन्स्पेक्टर यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत कोणतीही माहिती नाही. रुग्णालयाच्या मदतीने तरुणाने विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. तत्पूर्वी, भाजप आघाडीच्या विजयामुळे दुखावलेल्या विरोधी समाजवादी पक्षाच्या (एसपी) कार्यकर्त्याने राजधानी लखनौमधील भाजप कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. एसपीच्या कार्यकर्त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आत्मदहनाचा प्रयत्न करणारा सपा कार्यकर्ता कानपूर नगरचा रहिवासी आहे. कानपूर नगरमधील रहिवासी नरेंद्र सिंह उर्फ ​​पिंटू ठाकूर याने यूपी निवडणुकीत सपाच्या पराभवानंतर भाजप कार्यालयात पोहोचल्यानंतर स्वतःला पेटवून घेतले.

Web Title: Akhilesh Yadav's party's defeat hurt the young man have poison, health is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.