अकोला महापालिकेचा लाचखोर आरोग्य निरीक्षक गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 11:52 AM2018-08-27T11:52:01+5:302018-08-27T12:01:19+5:30
अकोला - महापालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला सफाई कामगाराच्या जुलै महिन्यात झालेल्या ९ गैरहजेरी नियमीत करण्यासाठी एक हजार ८०० रुपयांची लाच घेणाऱ्या आरोग्य निरीक्षकास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सकाळी १० वाजता रंगेहाथ अटक केली.
अकोला - महापालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला सफाई कामगाराच्या जुलै महिन्यात झालेल्या ९ गैरहजेरी नियमीत करण्यासाठी एक हजार ८०० रुपयांची लाच घेणाऱ्या आरोग्य निरीक्षकास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सोमवारी सकाळी १० वाजता रंगेहाथ अटक केली. मंगेश कीसन बांगर असे आरोपीचे नाव आहे. आरोपीस सोमवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
महापालिकेत आरोग्य निरीक्षक म्हणूण कार्यरत असलेल्या मंगेश कीसन बांगर याच्या अखत्यारीत सफाई कामगार येतात. तक्रारकर्त्या पुरुषाची पत्नी महापालिकेत सफाई कामगार म्हणूण कार्यरत असून त्यांचे जुलै महिन्यात ९ गैरहजेरी झाल्या होत्या, या गैरहजेरी नियमीत करून त्याचे वेतन काढण्यासाठी बांगर याने महिलेच्या पतीला २०० रुपये प्रति गैरहजेरी या प्रमाणे ९ गैरहजेरीचे एक हजार ८०० रुपयांची लाच मागीतली. मात्र सफाई कामगारास लाच देणे नसल्याने त्यांनी या प्रकरणाची तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे केली. अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाºयांनी २५ आॅगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता लाच मागीतल्याचे सिध्द झाले. त्यानंतर सोमवार २७ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता लाच घेण्याचे ठिकाण ठरल्यानंतर आरोपी मंगेश कीसन बांगर याने तक्रारकर्त्याकडून एक हजार ८०० रुपयांची लाच स्विकारताच त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे प्रमूख संजय गोर्ले, गजानन दामोदर, सुनील राउत, राहुल इंगळे, सुनील येलोने, कैलास खडसे यांनी केली.