अकोटः जेवन बनविण्याचे कारणावरुन एकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 01:19 PM2021-05-02T13:19:50+5:302021-05-02T13:49:47+5:30

Murder : पिंप्री खुर्द शिवारात घडली घटना.

Akot: Murder of a man for cooking | अकोटः जेवन बनविण्याचे कारणावरुन एकाची हत्या

अकोटः जेवन बनविण्याचे कारणावरुन एकाची हत्या

Next

- विजय शिंदे
अकोटः सातपुडा पायथ्याशी असलेल्या पिंप्री खुर्द शिवारात जेवन बनविण्याचे कारणावरुन मध्यरात्री हत्याकांड घडल्याची घटना २ मे रोजी उघडकीस आली. या हत्याकांडानंतर पळालेल्या आरोपीला पकडण्यात ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांचा जनसंपर्क कामी आला. काही तासातच अकोट ग्रामीण पोलीसांनी मोठ्या शिताफीने पकडून बेड्या ठोकल्या आहेत.
अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील  गजानन बोदडे यांचे शेतात संत्रा झाडाची खोड काढण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील  गिरगोटी गावातील छबुलाल भुसुम, प्रभु राजराम धीकार व रतीराम राजाराम दारशिंबे हे तीन आदिवासी मजुर आले होते. या मजुरांनी दिवसभर काम करुन रात्री दारु ढोसली. त्यानंतर रात्री १२ वाजता नंतर स्वयंपाक कोणी करण्याचा या  कारणावरुन शेतातच वादावादी सुरु झाली. यावेळी
 प्रभु राजाराम धीकार यांने रतीरामला मारहाण केल्याने तो पळुन गेला. त्यानंतर छबुलाल भुसुम यांला प्रभु राजाराम धीकार यांने कुऱ्हाडाने व लाकडांनी चांगली मारहाण केली. त्यामुळे जखमी अवस्थेत असेल्या छाबुलाल भुसुम याचा मारहाणीत मृत्यू झाल्याने प्रभू धिकार पळुन गेला. त्यानंतळ सकाळी रतीराम हा शेतातील घटनास्थळी आल्यानंतर त्याला छबुलाल शुकलाल भुसुम ची हत्या झाली असुन मृतदेह आढळला. हत्याकांडाची माहीती मजुर कंत्राटदार शरिफोद्दीन नशीरोद्दीन रा. अकोट याला दिल्यानंतर पोलीस पाटील, रतीराम, शेतमालक व मजुर कंत्राटदार यांनी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले. सविस्तर घटनेची माहीती  घेताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील आरोपी प्रभु धीकार हा पळुन गेला होता. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी प्रभु धीकार यांचे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला सोमठाणा येथुन अटक केली असुन पुढील तपास सुरु आहे.

अशा ठोकल्या आरोपीला बेड्या
मध्यरात्री हत्याकांडानंतर आरोपी हा  घटनास्थळावरून जंगलाकडे पसार झाला असे लोकेशन पोलीसांना मिळाले. त्यामुळे आरोपीला पकडणे पोलीसांना अवघड झाले होते. पंरतु आरोपीला पकडण्यात अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांचा जनसंपर्क कामी आला. आरोपीचे वर्णन देत ठाणेदार व पोलीस पथकाने या भागातील जनतेला सतर्क केले. दरम्यान आरोपी प्रभु धीकार हा सोमठाणा येथे कपडे बदलुन आला होता. पळुन जाण्यासाठी नातेवाईकांचे मोटर सायकलची वाट बघत होता. जनसंपर्क मधील एका व्यक्तीने ठाणेदार फड यांना माहीती देत आरोपीचा फोटो पाठवुन पडताळणी केली असता, परिसरातील आदिवासी युवकांनी व ग्रामीण पोलीसांनी सोमठाणा येथे घेराव घालून पळुन जात असतांना आरोपीला पकडले केली.

Web Title: Akot: Murder of a man for cooking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.