दारुड्याला पोलीस ठाण्यात गोंधळ घालणं पडलं महागात; केले जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 21:10 IST2021-03-07T21:09:50+5:302021-03-07T21:10:08+5:30
Crime News : एका मद्यपीने पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

दारुड्याला पोलीस ठाण्यात गोंधळ घालणं पडलं महागात; केले जेरबंद
मीरारोड - काशीमीरा पोलीस ठाण्यात तक्रारदार महिलेसोबत आलेल्या एका मद्यपीने पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
शनिवारच्या पहाटे २ च्या सुमारास विवेक अनिल सिंग (३२) रा. गणेश चरण, खारीगाव, भाईंदर पूर्व हा एका तक्रारदार महिले सोबत मद्यधुंद अवस्थेत काशीमीरा पोलीस ठाण्यात गेला होता . महिला तक्रार सांगत असताना मध्ये मध्ये बोलून तक्रारदार यांना दिशाभुल तसेच पोलीसांना हातवारे करून अडथळा निर्माण करू लागला. पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न करत मास्क घाल म्हणून सांगितले. परंतु उद्धट बोलून दमदाटीची भाषा वापरू लागल्याने त्याच्यवर दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली .