महिलेने Netflix सबस्क्रिप्शनसाठी चुकीच्या लिंकवर केले क्लिक, झटक्यात गमावले एक लाख तीस हजार रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 18:30 IST2022-04-05T18:29:36+5:302022-04-05T18:30:03+5:30
cyber crime : एका महिलेने तक्रार केल्याप्रमाणे तिला नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घ्यायचे होते. पण तिने चुकीच्या लिंकवर सब्सक्रिप्शन केले.

महिलेने Netflix सबस्क्रिप्शनसाठी चुकीच्या लिंकवर केले क्लिक, झटक्यात गमावले एक लाख तीस हजार रुपये
गाझियाबाद : सध्या ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) केल्याच्या तक्रारी वाढताना दिसून येत आहेत. दरम्यान, ऑनलाइन फसवणुकीला बळी पडल्याची तक्रार केल्यानंतरही तुम्ही पुन्हा सायबरचे बळी (Cyber Crime) होऊ शकता. याआधी कमी फसवणूक झाली असेल, पण पुन्हा मोठी फसवणूक झाल्याची अनेक प्रकरणे पोलिसांसमोर (Police) येतात. गाझियाबाद जिल्ह्यातही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणांमध्ये ऑनलाइन फसवणूक किंवा पैसे हडप करण्यात आले. याशिवाय, एका वेबसाइटवर लिंक पाठवून स्वतःला पेटीएम कस्टमर केअरचा (Paytm Customer Care) कर्मचारी सांगून समोरच्या व्यक्तीची फसवणूक केली.
गाझियाबादमध्ये तीन महिन्यांत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ज्यांच्यासोबत सायबर फसवणूक केली होती. या प्रकरणी पीडितांनी सायबर पोलिसांना कळवले असून, तत्काळ तक्रार नोंदवण्यात आली आहे. सायबर सीओ अभय कुमार मिश्रा म्हणाले की, पोलिस सायबर क्राईमवर कारवाई करत आहेत. पोलिसांनी तीन महिन्यांत पीडितांना ४३ लाख रुपये मिळवून दिले आहेत.यामध्ये अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
एका महिलेने तक्रार केल्याप्रमाणे तिला नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घ्यायचे होते. पण तिने चुकीच्या लिंकवर सब्सक्रिप्शन केले. त्यामुळे सायबर भामट्यांनी एक लाख तीस हजार रुपये हडप केले. तसेच अनेकांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक झाली आहे. मात्र, या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अशा पीडितांना पैसे परत मिळवून दिले आहेत, तर अनेक प्रकरणांवर पोलीस सातत्याने काम करत आहेत. लोकांनी सतर्क राहावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
पेटीएम वॉलेटच्या माध्यमातून इतर सायबर फसवणुकीद्वारे कोणताही गुन्हा घडला असेल तर त्याची 24 तासांच्या आत तात्काळ पोलिसांना तक्रार करावी. तक्रार नोंदवल्यानंतर संबंधित एजन्सीला माहिती दिली जाते. ईमेलच्या माध्यमातून गाझियाबाद सायबर पोलीसही अनेक प्रकरणांवर कसरत करत आहेत. सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांची मोहीम सुरू आहे.