Aligarh: "मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 16:01 IST2025-04-17T16:01:08+5:302025-04-17T16:01:32+5:30
Aligarh Love Story: अलिगडमधून फरार झालेल्या सासू आणि जावयाला बुधवारी पोलिसांनी पकडलं. सध्या दोघांचीही चौकशी सुरू आहे.

Aligarh: "मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
अलिगडमधून फरार झालेल्या सासू आणि जावयाला बुधवारी पोलिसांनी पकडलं. सध्या दोघांचीही चौकशी सुरू आहे. दोघांनीही त्यांचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. दोघांनाही आता एकत्र राहायचं आहे. होणाऱ्या सासूसोबत पळून गेलेला जावई राहुल म्हणाला की, मी तिच्याशी लग्न करण्यास तयार आहे. बाकी तिची इच्छा आहे.
"माझी सासूवर वाईट नजर नव्हती. तिचा नवरा तिला त्रास द्यायचा. तो तिला मारहाण करायचा आणि खूप शिवीगाळ करायचा. ती तिच्याच पतीवर खूप नाराज होती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यही तिला सपोर्ट करत नव्हते. मग ती माझ्याशी बोलू लागला आणि तिने मला सर्व काही सांगितलं. ६ एप्रिल रोजी मी खरेदीसाठी बाहेर गेलो होतो तेव्हा मला तिचा फोन आला आणि ती म्हणाली की जर तू मला घ्यायला आला नाहीस तर मी मरेन. तिने कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नये म्हणून मी तिथे गेलो होतो."
"मी तिच्याशी लग्न करण्यास तयार"
"आम्ही दोघे कासगंजमध्ये भेटलो. त्यानंतर ७ एप्रिल रोजी मुझफ्फरपूरला पोहोचलो. जेव्हा आम्हाला कळलं की पोलीस आम्हाला शोधत आहेत, तेव्हा आम्ही विचार केला की सरेंडर होऊया. मग आम्ही दादोन पोलीस स्टेशनला पोहोचलो. लग्न आणि बाकी सर्व तिच्यावर अवलंबून आहे. जर तिची इच्छा असेल तर मी तिच्याशी लग्न करण्यास तयार आहे. ती जे काही म्हणेल ते होईल. अट फक्त एवढीच आहे की तिची इच्छा असावी. मला फक्त तिच्यासोबत राहायचं आहे. वयामुळे काही फरक पडत नाही" असं राहुलने म्हटलं आहे.
" राहुल खूप चांगला आहे"
सासू अपना देवी म्हणाली की, माझ्या पतीला मी जावयाशी बोललेलं आवडत नव्हतं. एकदा त्याने तर तू राहुलसोबत पळून जा असं म्हटलं होतं. आता जर पतीने असा आरोप केला तर पत्नीचं काय होईल? मग मी राहुलला या सर्व गोष्टी सांगितल्या. राहुल खूप चांगला आहे. त्याला माझी बाजू समजली. आम्ही दोघांनी आपापसात ठरवलं की, आता आपल्याला एकत्र राहायचं आहे. घरातून पळून गेल्यानंतर आम्ही दोघे कासगंजमध्ये भेटलो.
"मी राहुलला माझा नवरा म्हणून स्वीकारलं"
आम्ही दोघेही बसने बरेलीला पोहोचलो. येथून आम्ही बिहारला जाणारी बस पकडली आणि बिहारमधील मुझफ्फरपूरला गेलो. तिथे एका हॉटेलमध्ये राहिलो होतो. राहुल नोकरी शोधत होता. आम्ही दोन दिवसांपूर्वी आमचे फोन चालू केले. आम्हाला सोशल मीडियावरून कळलं की पोलीस दोघांनाही उत्तराखंडमध्ये शोधत आहेत. आम्ही बसमध्ये बसलो आणि मुझफ्फरपूरहून दिल्लीला पोहोचलो. मी राहुलला माझा नवरा म्हणून स्वीकारलं आहे. आता तो माझा नवरा आहे असं सासूने म्हटलं आहे.
धक्कादायक! सासू आधी शेजारच्या गावातील महिलेसोबत गेलेला पळून; जावयाचा नवा कारनामा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल याआधीही एका महिलेसोबत पळून गेला होता. ती महिला शेजारच्या गावातील होती. दोघेही दोन महिन्यांनी घरी परतले. त्यावेळी महिलेच्या कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केली नाही, त्यामुळे कोणतीही कारवाई झाली नाही. यावेळी राहुल त्याच्या होणार्या सासूसोबत पळून गेला. जितेंद्र आणि अनिता यांच्या मुलीचं लग्न १६ एप्रिल रोजी राहुलशी होणार होतं. लग्न ठरल्यानंतरच्या तीन महिन्यांतच राहुल आणि अनिता एकमेकांच्या प्रेमात पडले. ते तासनतास फोनवर बोलत असत.