Aligarh Poison Liquor : धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूने घेतला तब्बल 85 जणांचा बळी; 33 जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 08:17 AM2021-06-02T08:17:52+5:302021-06-02T08:33:39+5:30

85 dead in Aligarh Poisonous Liquor Case : करसुआ गावात विषारी दारू प्यायल्याने 85 लोकांचे मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

aligarh karsua village pradhan claim after giving complaint liquor shop not closed from excise department | Aligarh Poison Liquor : धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूने घेतला तब्बल 85 जणांचा बळी; 33 जणांना अटक 

Aligarh Poison Liquor : धक्कादायक! उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूने घेतला तब्बल 85 जणांचा बळी; 33 जणांना अटक 

googlenewsNext

नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये विषारी दारूने तब्बल 85 जणांचा बळी घेतला आहे. अलीगडमधील करसुआ गावात विषारी दारू प्यायल्याने (Aligarh Poison Liquor) 85 लोकांचे मृत्यू झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या गावच्या सरपंचांनी ऑक्टोबर 2020 मध्येच तक्रार देऊन हा दारूचं हे दुकान बंद करण्याची मागणी केली होती. मात्र तो बंद झाला नाही आणि आता 85 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

अलीगडमधील करसुआ गावात विषारी देशी दारूची विक्री केली जात आहे. गावकऱ्यांनी लेखी तक्रार (Written Complaint) दिल्यानंतरही प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. करसुआ गावचे सरपंच रितेश उपाध्याय यांनी स्वतः याबाब उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारी केली होती (Complaint To Liquor Shop). यानंतर उत्पादन शुल्क विभागाने या दारूच्या दुकानाला क्लिन चिट दिली. आता येथील दारूने अनेक लोकांचे जीव घेतलेत.गावच्या सरपंचांनी त्यांच्याकडे केलेल्या तक्रारीची एक कॉपी असल्याचं देखील म्हटलं आहे. आधी तक्रार देऊनही कारवाई न करणारं प्रशासन इतक्या लोकांच्या मृत्यूनंतर आता खडबडून जागं झालं आहे. 

मुख्य आरोपीसह आतापर्यंत एकूण 33 जणांना अटक

विषारी दारू मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह आतापर्यंत एकूण 33 जणांना अटक केली आहे. यामध्ये 50-50 हजार रुपयांचं बक्षीस असलेल्या काही गुन्हेगारांचा देखील समावेश आहे. एसएसपी कलानिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "या प्रकरणाच्या तपासासाठी 6 सदस्यीय समितीची नियुक्त करण्यात आली आहे. ही समिती पुराव्यांच्या आधारे छापेमारी करत आहे. अवैध दारू निर्मितीत वापरण्यात येणारं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. पोलीस सातत्याने छापेमारी करत आहेत."

"विषारी दारू प्यायल्यामुळे आतापर्यंत 84 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही घटना होऊन 4 दिवस झालेत. तेव्हापासून दररोज मृतांचा आकडा वाढत आहे. हा आकडाही वाढण्याची शक्यता आहे." अनेकजण अद्याप रुग्णालयात गंभीर स्थितीत आहेत. मात्र, सरकारवर आता मृत्यूची आकडेवारी लपवला जात असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने आतापर्यंत केवळ 25 मृत्यूची माहिती दिलीय. याशिवाय झालेले मृत्यू संशयास्पद आहेत असून या मृतदेहांच्या शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल, असा दावा त्यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: aligarh karsua village pradhan claim after giving complaint liquor shop not closed from excise department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.