मेडिकल कॉलेजमधून अचानक गायब झाली महिला रूग्ण, बाथरूममध्ये एक तरूण करत होता रेप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 13:17 IST2021-10-02T13:15:18+5:302021-10-02T13:17:34+5:30
घटनेनंतर मेडिकल कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली आणि जेएन मेडिकल कॉलेजच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.

मेडिकल कॉलेजमधून अचानक गायब झाली महिला रूग्ण, बाथरूममध्ये एक तरूण करत होता रेप...
उत्तर प्रदेशच्या अलिगढ मुस्लिम यूनिव्हर्सिटीच्या जेएन मेडिकल कॉलेजमद्ये एका महिला रूग्णासोबत रेपची घटना समोर आली आहे. पीडित महिला रूग्णाला मदत करण्याच्या नावावर एका बाहेरच्या तरूणाने तिच्यावर रेप केला. जेएन मेडिकल कॉलेजमधील सिक्युरिटी गार्डने बाथरूममध्ये तरूणाला महिलेवर अत्याचार करताना रंगेहाथ पकडलं. घटनेनंतर मेडिकल कॉलेजमध्ये एकच खळबळ उडाली आणि जेएन मेडिकल कॉलेजच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.
अलिगढ मुस्लिम यूनिव्हर्सिटीचे जेएन मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी एका महिला रूग्णावर एका बाहेरच्या तरूणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साधारण तीन महिन्यापूर्वी अलिगढ, आरपीएफ द्वारे एक महिला रूग्णाला इथे दाखल करण्यात आलं होतं. तिच्यावर मेडिकल कॉलेजच्या रिकव्हरी वार्डात उपचार सुरू होते.
आरोपी तरूण महिलेच्या मदतीसाठी रोज वार्डात येत होता. थोड्या वेळासाठी वार्डातून महिला अचानक गायब झाली. तेव्हा सुरक्षा रक्षकाने सगळीकडे तिचा शोध घेणं सुरू केलं. सुरक्षाकर्मी जेव्हा बाथरूममध्ये पोहोचला तेव्हा त्याला दिसलं की, आरोपी तरूण महिलेसोबत बलात्कार करत होता. सिक्युरिटी गार्डने बाथरूममध्ये पीडित महिलेवर बलात्कार करताना आरोपीला रंगेहाथ पकडलं.
घटनेनंतर जेएन मेडिकल कॉलेज प्रशासनात गोंधळ उडाला आणि लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस अधिकारी श्वेताभ पांडेय म्हणाले की, पोलिसांनी मेडिकल कॉलेजच्या तक्रारीवरून आरोपीला अटक केली. आता पुढील चौकशी सुरू आहे.