डीआयजीच्या पत्नीने केला आरोप; माझ्या पतीला अडकविण्याचा मुलीच्या वडिलांचा कट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 06:11 PM2020-01-10T18:11:19+5:302020-01-10T18:13:17+5:30
याप्रकरणात जाणीवपूर्वक डीआयजींना गोवण्यात आल्याचा आरोप मोरेंच्या पत्नीने केला आहे.
पनवेल -डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप लावलेली अल्पवयीन मुलगी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. या प्रकरणाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असलेली सुसाईड नोट ठेवून ती गेली होती. मात्र, आता एका रेल्वे स्थानकावर ती आपल्या नातेवाईकाबरोबर प्रवास करीत असल्याचा सीसीटीव्ही मिळाला आहे. मात्र याप्रकरणात जाणीवपूर्वक डीआयजींना गोवण्यात आल्याचा आरोप मोरेंच्या पत्नीने केला आहे.
डीआयजीच्या पत्नीने केला आरोप; माझ्या पतीला अडकविण्याचा मुलीच्या वडिलांचा कट https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) January 10, 2020
अल्पवयीन मुलगी आपल्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर उत्तर प्रदेशला गेली असल्याचे पोलीसांना सीसीटीव्हीतून कळाले आहे. सीसीटीव्ही समोर आल्याने यात निशिकांत मोरे यांचा कोणताही हात नसल्याचे त्यांच्या पत्नीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. डीआयजी असलेल्या मोरे यांना नाहक बदनाम केले जात असून त्यांच्यावर खोटी विनयभंगाची केस लावली आहे. अल्पवयीन मुलगी स्वत: आपल्या ओळखीच्या व्यक्तीबरोबर जात असल्याने तिला बेपत्ता झाल्याचे दाखवून निशिकांत मोरे यांना याप्रकरणी गोवण्याचा कट मुलीच्या वडीलांनी केला असल्याचा आरोप निशीका मोरे यांनी केला आहे. मुलीच्या वडिलांकडे असलेले आपले पैसे मागितले असता विनयभंगाची तक्रार केल्याचा खुलासा मोरे यांच्या पत्नीने केला आहे. अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे देखील नाशिका मोरे यांनी स्पष्ट केले आहे.