सर्व आरोप खोटे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात अर्णब करणार अब्रुनुकसानीचा दावा

By पूनम अपराज | Published: October 8, 2020 08:57 PM2020-10-08T20:57:55+5:302020-10-08T21:15:08+5:30

TRP Scam : रिपब्लिकच्या संशयितांना समन्स पाठवणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे.

All allegations are false, defamation claim against Mumbai Police Commissioner Parambir Singh | सर्व आरोप खोटे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात अर्णब करणार अब्रुनुकसानीचा दावा

सर्व आरोप खोटे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात अर्णब करणार अब्रुनुकसानीचा दावा

googlenewsNext
ठळक मुद्दे रिपब्लिक चॅनलचे व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामी यांनी सर्व आरोप खोटे असल्याचा दावा करत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं म्हटले आहे. 

टीव्ही चॅनल्सच्या जगतात आज खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. काही चॅनल्सनी टीआरपी वाढवण्यासाठी रॅकेट चालवल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.रिपब्लिक टेलिव्हिजनचे प्रमोटर्स रॅकेटमध्ये सहभागी असून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. तसेच रिपब्लिकच्या संशयितांना समन्स पाठवणार असल्याचे देखील स्पष्ट केले आहे. दरम्यान, रिपब्लिक चॅनलचे व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामी यांनी सर्व आरोप खोटे असल्याचा दावा करत मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं म्हटले आहे. 

बनावट टीआरपी प्रकरणी रिपब्लिक टीव्ही चौकशीच्या फेऱ्यात, दोषी आढळल्यास संबंधितांना होणार एवढी शिक्षा

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग रिपब्लिक टीव्हीविरोधात खोटे आरोप करत आहेत. कारण आम्ही त्यांच्यावर सुशांत सिंग राजपूत मृत्यूच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित केले. रिपब्लिक टीव्ही मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असून BARC ने असला कोणताही अहवाल दिलेला नाही. ज्या अहवालात रिपब्लिक टीव्हीचे नाव असेल. देशातील जनतेला सत्य माहित आहे. सुशांत सिंग राजपूत केसमध्ये परमबीर सिंग यांचा तपास संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. कारण रिपब्लिक टीव्हीने सुशांत आणि पालघर केसबाबत देशाला सत्य दाखवलं. याचा बदला म्हणून केलेल्या कारवाईबाबत रिपब्लिक टीव्हीचा एक एक सदस्य सत्याच्या मागे बळकटपणे उभा राहील. परमबीर सिंग यांचा पूर्णपणे पर्दाफाश होणार कारण, बार्क (BARC) ने आपल्या कोणत्याही तक्रारीत रिपब्लिक टीव्हीचं नाव घेतलेलं नाही. परमबीर सिंग यांना याप्रकरणी माफी मागावी लागेल आणि कोर्टाच्या न्यायालयीन कारवाईला सामोरं जाण्यासाठी तयार राहावं लागेल, असे आव्हान अर्णब यांनी पोलीस आययुक्त परमबीर सिंग यांना दिले आहे.  

Breaking : खोट्या TRPचा पर्दाफाश! रिपब्लिक टीव्ही चौकशीच्या फेऱ्यात, दोन मराठी चॅनेलचे मालक अटकेत

Web Title: All allegations are false, defamation claim against Mumbai Police Commissioner Parambir Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.