स्फोटक प्रकरणातील चारही आरोपींना आज न्यायालयात हजर करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 02:29 AM2018-09-03T02:29:04+5:302018-09-03T07:39:19+5:30
स्फोटक प्रकरणातील चार आरोपींची कोठडी संपत असल्याने, त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्या चौकशीत अनेक महत्त्वपूर्ण माहिती एटीएसच्या हाती लागली आहे.
मुंबई : स्फोटक प्रकरणातील चार आरोपींची कोठडी संपत असल्याने, त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्या चौकशीत अनेक महत्त्वपूर्ण माहिती एटीएसच्या हाती लागली आहे. त्यातून समोर आलेल्या बाबींच्या आधारे एटीएसकडून त्यांच्या वाढीव कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.
स्फोटक प्रकरणात अटक करण्यात आलेले वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर आणि श्रीकांत पांगरकर या चौघांकडून आतापर्यंत अनेक महत्त्वाच्या घटनांचा उलगडा झाला आहे, तसेच त्यांच्याकडून शस्त्रसाठ्याबरोबरच वाहने जप्त करण्यात आली आहे. यामध्ये दुचाकींबरोबर चार चाकी वाहनांचा समावेश आहे. या चौघांमागील मास्टरमाइंड अजूनही पडद्याआड आहे. चौघेही नेमके कुणाच्या इशाऱ्यावरून काम करत होते? याचा उलगडा न्यायालयात होण्याची शक्यता आहे.